वीर धरणाच्या एका दरवाजातून नीरा नदीत 1250 क्युसेकने विसर्ग

नीरा  : पोलीसनामा ऑनलाइन  –  सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील असलेले नीरा खो-यातील वीर धरण बुधवारी (दि.१२) दुपारी चार वाजता ९९ टक्के भरले. त्यामुळे वीर धरणाचा पाच नंबरचा दरवाजा एक फुटाने उचलून धरणातून १हजार २५० क्युसेक्स प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आल्याची माहिती वीर धरण उपविभागाचे सहाय्यक अभियंता विजय नलवडे यांनी दिली.

गेल्या पंधरा दिवसापासून नीरा देवघर, भाटघर, गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संंततधार पाऊस पडत असल्यामुळे पावसाचे पाणी वीर धरणात येत होते. त्यामुुळे वीर धरणाची पाणी पातळी हळू – हळू वाढू लागली . त्यामुळे बुधवारी (दि.१२) दुपारी वीर धरण ९९ टक्के भरून ओव्हरफ्लोच्या मार्गावर होते. तसेच नीरा खो-यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची शक्यता असल्यामुळे वीर धरणाची पाण्याची आवक वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे वीर धरणाचा पाच नंबरचा दरवाजा एक फुटाने उचलून १ हजार २५० क्युसेक्स प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला. तर मंगळवारी (दि.११) वीर धरणाच्या विद्युत गृहातून ८०० क्युसेक्स प्रतिसेकंदाने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला. त्यामुळे गेल्या वर्षापेक्षा या वर्षी नीरा नदी उशीराने वाहू लागणार आहे. तसेेेच वीर धरण ओव्हरफ्लोच्या मार्गावर असल्याने नीरा डावा व नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, वीर धरणात बुधवारी (दि.१२) दुपारी चारच्या सुमारास ९९ टक्के पाणी साठा झाला असून नीरा खो-यातील धरण परिसरात सद्या पाऊस कमी अधिक प्रमाणात आहे. पावसाचा जोर आणखी वाढला तर सद्याच्या १ हजार २५० क्युसेक्स पेक्षाही जादा पाण्याचा विसर्ग सोडण्यात येण्याची शक्यता जलसंपदा विभागाच्या सुत्रांकडून व्यक्त करण्यात आली.