Pune News : जुन्नरमध्ये सापडला दुर्मीळ जातीचा मासा

ओझरः पोलीसनामा ऑनलाईन – शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील कुकडी नदीवरील कोल्हापूरी पध्दतीच्या बंधा-यात मच्छीमारांच्या जाळ्यात दुर्मीळ जातीचा मासा सापडला आहे. फिकट पिवळ्या रंगाच्या या माशाच्या शरीरावर खवले नसून काटे आहेत. जुन्नर परिसरात अशा प्रकारचा मासा आढळल्याची नोंद यापूर्वी झालेली नाही. प्रथमच असा मासा सापडल्याने या माशाबाबत उत्सुकता आहे.

सुभाष भांगरे या मच्छीमारांच्या जाळ्यात हा मासा सापडला असून त्यांनी तो टबमध्ये जिवंत ठेवला आहे. या माशाच्या अंगावर काळ्या व सोनरी रंगाची सुंदर नक्षी असून त्याचे डोळे चमकदार आहेत. सध्या हा आगळा वेगळा मासा परिसरात कुतूहलाचा विषय बनला आहे.