गिरीष महाजन, छगन भुजबळ भेटीमुळे चर्चेला उधाण

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि छगन भुजबळ यांच्या भेटीमुळे राजकिय वर्तूळात अनेक चर्चेला उधान आलं आहे. गिरीष महाजन यांनी छगन भुजबळ यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दरम्यान भुजबळ तरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी अनेक राजकीय नेत्यांची रिघ लागली आहे. मात्र दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्त्यात आहे.

त्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी महाजन भुजबळांच्या भेटीला गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. काल शनिवारी शरद यादव यांनी देखील भुजबळांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली होती. ततेच लालूप्रसाद यादवांनीही भुजबळांशी फोनवरुन चर्चा केली होती.

तरुंगातून बाहेर पडल्यानंतर भुजबळांचं राजकीय वजन वाढताना दिसत आहे. त्यामुळेच गिरीष महाजनांसोबतच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यावरुन लोकांमध्ये चांगलीच चर्चा रंगल्याचे बघायला मिळत आहे.