टीव्हीवर बाजू न मांडता आंदोलकांशी चर्चा करा :  खा. संभाजीराजे 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज  २४ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदे यांना शहीद घोषित करुन त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली.

[amazon_link asins=’B06Y66GKGN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e04e2c0d-8f13-11e8-aa55-cf7a4398e353′]

याबाबत बोलत असताना खा. संभाजीराजे यांनी औरंगाबादमधील मराठा आंदोलकाच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मराठा समाजाच्या भावना किती तीव्र आहेत हे मी समजू शकतो, असे व्यक्त केले. त्याच बरोबर मुख्यमंत्र्यांना आवाहनही केले. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, कुठलाही वेळ न दवडता त्यांनी आंदोलकांशी तातडीने चर्चा करावी. केवळ टीव्हीमध्ये आपली बाजू न सांगता मराठा समाजाच्या सर्व घटकांना सर्व नेत्यांना एकत्र बोलावून त्यांच्याशी वन-टू-वन चर्चा करावी. यासंदर्भात सरकारी पातळीवर जे जे शक्य आहे ते करण्यासाठी तातडीने मिटिंग बोलवावी.”

संभाजीराजेंच्या या व्यक्तव्यावर मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वजण लक्ष वेधून बसले आहेत.