भारत ‘जिंकणार’च असल्याने भारत-पाक मॅच दरम्यान चर्चा केवळ ‘या’ अभिनेत्याच्या ‘OUTFIT’ची

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला ८९ धावांनी पराभूत करत आपली या स्पर्धेतील चांगली कामगिरी कायम राखली. या सामन्यात रोहित शर्मा याने शानदार शतकी खेळी करत भारतीय संघाचा विजयात मोलाची भूमिका बजावली. मात्र या सगळ्यात मैदानावर खेळापेक्षा एका अभिनेत्याच्या कपड्यांचीच जास्त चर्चा होत होती. त्या अभिनेत्याचे नाव आहे रणवीर सिंह. रणवीर सिंह बॉलिवूडमध्ये आपल्या स्टाइलसाठी ओळखला जातो. विविध प्रकारची कपडे घालून तो कार्यक्रमात जात असतो. अनेकवेळा आपण त्याला रंगीबेरंगी आणि अतरंगी कपड्यांमध्ये पहिले आहे.

त्याचप्रमाणे काल देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे  होते. त्याने घातलेले मोठे गॉगल्स आणि चेक्स सूट सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या सामन्यादरम्यान त्यानं कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील हात आजमावले. त्याचबरोबर त्याने मैदानावर जाऊन दिग्गज खेळाडूंसोबत संवाद देखील साधला. या सामन्यात तो त्याच्या आगामी ८३ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी देखील आला होता.

दरम्यान, रणवीर सिंह सध्या ८३ चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट १९८३ च्या वर्ल्डकपमध्ये भारताने ऐतिहासिक विजयावर आधारीत आहे. रणवीर सिंह यामध्ये कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोणही कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. लग्नानंतर रणवीर आणि दीपिका पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. दीपवीरचे चाहतेही या दोघांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

You might also like