आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची सरसंघचालकांशी चर्चा?

Advt.

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली. या चर्चेतील मुद्दे बाहेर आले नाही मात्र, सरसंघचालकांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासाठी गेल्याचा दावा सूत्रांनी केला. मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यातील मराठा आरक्षण व इतर मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

[amazon_link asins=’B01LWOW7Y2,B07C6GSPCV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e775b81a-b964-11e8-bab3-f3c094b6260d’]

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीही संघ मुख्यालयात गेले होते. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संघ मुख्यालयास भेट दिली. प्रदीर्घ काळानंतर ते संघाच्या मुख्यालयात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरसंघचालकांना शुभेच्छा देऊन सुमारे पाऊणतास राज्यातील विविध मुद्द्यावर चर्चा केली. यापूर्वी प्रतिनिधी सभेदरम्यान रेशीमबागेतील स्मृती मंदिरात मुख्यमंत्री गेले होते.

पुढील पाच वर्षांसाठीही मीच मुख्यमंत्री : फडणवीस

बँकांनीच बुडविला १०० कोटींचा जीएसटी