पुण्यातील कोरोना संसर्ग स्थिती, उपाययोजना, लसीकरण आणि व्हेंटिलेटरसंदर्भात केंद्रीय पथकाशी चर्चा !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील कोरोना संसर्गाची सद्यस्थिती, बेड्सची उपलब्धता आणि लसीकरण या संदर्भात केंद्रीय पथकाचे नोडल अधिकारी आणि पुणे महानगरपालिकेचे माजी आयुक्त कुणाल कुमार यांच्याशी आज सविस्तर चर्चा झाली. पुणे शहरातील कोरोना संसर्गाची सद्यस्थिती आणि आपण करत असलेल्या उपाययोजना याची माहिती कुणाल कुमार यांना अवगत केली.

व्हेंटिलेटर बेड्स आणि लशीच्या मागणीसोबतच ऑक्सिजन बेड्सची आगामी काळातील गरज यावरही संवाद साधला. आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदनही त्यांना दिले. विभागीय आयुक्त सौरव राव हेही, आयुक्त विक्रम कुमार, शहर सुधारणा समिती अध्यक्ष आनंद रिठे, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल या वेळी उपस्थित होते.