‘अकिलिस टेंडन’ समस्या काय आहे ? जाणून घ्या 4 लक्षणे, असे केले जातात उपचार

अकिलिस टेंडन मेदयुक्त बनलेली एक पट्टी आहे, जी स्नायूंना हाडांशी जोडते. हे पायच्या खालच्या बाजूला मागे असते. जी पिंढरीच्या मांसपेशींना टाचांच्या हाडांशी जोडते. अकिलिस टेंडन ही समस्या प्रामुख्याने धावपटूंमध्ये सामान्य आहे. वृद्ध लोक आणि गतीमान हालचाली करण्या लोकांमध्ये सुद्धा उद्भवू शकते.

ही आहेत लक्षणे
1 पायाच्या मागच्या बाजूला वेदना होणे
2 चालणे, किंवा खेळल्यानंतर वेदना होणे
3 जिना चढणे आणि काही वेगवान हालचाली केल्यानंतर वेदना आणखी वाढतात.
4 आखडणे आणि स्पर्श केल्यास वेदना होणे

ही आहेत कारणे
वेगवान शारिरीक हालचाली वाढवणे आणि कमी करणे यामुळे ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. विशिष्ट प्रकारच्या खेळांमध्ये भाग घेतल्यामुळे अकिलिसची समस्या उद्भवू शकते, जसे की धावणे, जिम्नॅस्टिक, नृत्य, फुटबॉल, हॉकी आणि इतर खेळ.

असे केले जातात उपचार
या रोगाचे निदान करण्यासाठी डॉक्टर शारीरिक तपासणी करतात. पिंढरी आणि टाचेच्या वेदनांसंबंधी प्रश्न विचारले जातात. इमेजिंग चाचण्या केल्या जाऊ शकतात, जसे की एक्स-रे, एमआरआय स्कॅन आणि अल्ट्रासाऊंड स्कॅन.

पायांना आराम देणे, बर्फाने शेकणे, पायावर सौम्य दाबाने पट्टी बांधणे, आणि पाय हृदयाच्या पातळीपेक्षा वर ठेवणे. तीव्र वेदना आणि सूज कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे आणि काही स्ट्रेचिंगचे व्यायाम देखील सांगितले जाऊ शकतात.