जुलाब होणं म्हणजे नेमकं काय ? काय आहेत याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ ?

पोलीसनामा ऑनलाइन –
लाब (अतिसार) म्हणजे काय ?
गॅस्ट्रेइंटेस्टाईनल संक्रमण दर्शवणारं एक लक्षण म्हणजे जुलाब आहे. यालाच आपण अतिसार असंही म्हणतो. हे संक्रमण जीवाणू, विषाणू किंवा परजीवीमुळं होऊ शकतं. इतर आरोग्यविषयक स्थितीतही जुलाब होण्याची शक्यता असते. तीव्र अतिसार बरेच दिवस किंवा काही आठवडे टिकू शकतो. यामुळं गंभीर द्रवपदार्थ हानी आणि नर्जलीकरण होऊ शकतं. याचा वेळेत उपचार केला नाही तर ते घातकही ठरू शकतं.

काय आहेत आहेत याची लक्षणं ?
पोटात वेदना
पोटातील आकड्या
पोट फुगल्यासारखं वाटणं
वाढलेली तहान
वजन कमी होणं
ताप
मळमळ
अचानक शौचास येते

याची काही गंभीर लक्षणं पुढीलप्रमाणे –
सतत उलटी
शौचेत रक्त येणं
निर्जलीकरण

यावरील उपचार कोणते ?
1) तीव्र अतिसार –
यासाठी सहज मिळणारी औषधं दिली जाऊ शकतात. रक्तस्त्राव किंवा अतिसारानं ताप आला असेल तर अशी औषधं देऊ नयेत. जर अतिसार 2 दिवस रहात असेल तर डॉक्टरांची भेट घ्या

2) तीव्र आणि स्थायी अतिसार – तीव्र आणि स्थायी अतिसाराचा उपचार हा कारणांवर अवलंबून असतो. परजीवी आणि जीावाणूंच्या वाढीला प्रतिबंध करणारी आणि रोखणारी अनेक प्रतिजैविकं निर्धारीत केली जातात. क्रोहन्स रोग, अल्सरेटीव्ह कोलायटीस आणि इरिटेवल बॉव्हेल सिंड्रोममुळं होणाऱ्या अतिसारांसाठी विशिष्ट औषधं दिली जातात.

जीवनशेली व्यवस्थापन – जीवनशैलीत काही बदल करून अतिसार लक्षणांचे निराकरण केले जाऊ शकते आणि भविष्यात टाळले जाऊ शकते. यातील काही गोष्टी पुढीलप्रमाणे

1) संक्रमणाची शक्यता कमी करणं –
शौचानंतर साबणानं हात धुणं
स्वयंपाक करण्यापूर्वी आणि नंतर हात धुणं
उकळलेलं किवा बाटलीबंद पाणी पिणं

2) पुढील गोष्टी टाळाव्यात
नळाचं पाणी पिणं
पेय, रस किंवा बर्फ तयार करण्यासाठी नळाचं पाणी वापरणं
पाश्चराईज न केलेलं दूध पिणं
रस्त्याच्या कडेला खाणं
कच्चं आणि न शिजवलेलं अन्न किंव मांस खाणं
मद्यपान
मसालेदार पदार्थ
सफरचंद किंवा नाशपाती सारखी फळं
कॅफिनयुक्त पेय
डाएट कोला पेय, कृत्रिम गोडी असणारी पेये. कँडीस आणि गम.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.