‘ई कोलाई’ संसर्ग म्हणजे काय ? काय आहेत याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’

पोलीसनामा ऑनलाइन –

ई कोलाई संसर्ग म्हणजे काय ?
एस्चेरिचिया कोलाई, ज्याला सामान्यत: ई कोलाई म्हटलं जातं ते आपल्या आतड्यातील नैसर्गिक निवासी आहेत. 1880 च्या दशकाच्या उत्तरार्धात या जीवाणूंचा शोध लागला होता. याचे 7 वेगवेगळे रोगप्रकार आहेत जे मूत्रमार्गाच्या संसर्गास (युरीनरी ट्रॅक इंफेक्शन युटीआय), सेप्टीसिमीया, मेनिनजायटीस आणि अतिसार सारख्या विविध संसर्गासाठी जबाबदार आहेत. भारतात ई कोलाई संसर्ग सामान्यत: दरवर्षी पाहिले जातात. अतिसार आणि युटीआय हा सर्वात सामान्य आहे.

काय आहेत याची लक्षणं ?
पाण्यासारखी विष्ठा आणि उलट्या
हेमोरॅगिक कोलायटीस, रक्तरंजित विष्ठा
पोटात सूज, आतड्याच्या भिंतीवर घाव आणि पाण्यासारखी विष्ठा
युटीआय
निओनेटेल मेनिनजाटीस

काय आहेत याची कारणं ?
दूषित पाणी पिणं
दूषित अन्न ग्रहण करणं
ई कोलाईनं ग्रासित दूषित जमिनीत उगवलेल्या भाज्या खाणं
आरोग्यास हानिकारक खाण्याच्या सवयी
ई कोलाईसोबत दूषित रुग्णालयातील सांडपाणी

काय आहेत यावरील उपचार
अँटीबायोटीक्सचा तर्कशुद्ध वापर
प्रोबायोटीक्स
बॅक्टेरियोफेज थेरपी
अँटीमायक्रोबियल पेप्टाईड्स

औषधांव्यतिरीक्त काही काळजी घेणं गरजेचं आहे. ती पुढीलप्रमाणे
भरपूर पाणी पिणं
विश्रांती घेणं
स्वच्छता
सुरक्षित आहार