डोळ्यात चिपड का बनतं ? काय आहेत याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ ? जाणून घ्या

काय आहे डोळ्यातील चिपाड ?

डोळ्यांचं संरक्षण होण्यासाठी आणि त्यांचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी आपले डोळे काही प्रमाणात म्युकस सतत निर्माण करत असतात. डोळ्यांची उघडझाप होताना हा म्युकस पातळ थराच्या रूपात बाहेर टाकला जातो. जेव्हा आपण झोपतो तेव्हा डोळ्यांची उघडझाप होत नाही त्यामुळं हा म्युकस साठून राहतो आणि डोळ्यांच्या किंवा पापण्यांच्या कडेला पापुद्र्याच्या स्वरूपात जमा होतो. परंतु यांच प्रमाण जास्त असेल किंवा याचा रंग बदलत असेल (हिरवट किंवा पिवळट) तर हे योग्य समजलं जात नाही.

काय आहेत याची लक्षणं

– डोळ्यात पस किंवा चिपाड जमा होणं (पिवळट किंवा हिरवट रंगाचं)
– पापण्या किंवा पापण्यांच्या केसांवर सुकलेला पस जमा होणं
– झोपेतून उठल्यानंतर पापण्यांच्या केसांना चिकटपणा जाणवणं किंवा त्या एकत्र चिकटणं
– डोळ्यातील पांढरा भाग गुलाबी किंवा लालसर होणं (हे होईलच असं नाही.
– पापण्यांना सूज येणं हे सामान्यत: दिसून येतं.

गंभीर प्रकरणात दिसणारी काही लक्षणं

– अति ताप (104 F पेक्षा जास्त)
– डोळे जास्त दुखणं, पापण्या सुजणं किंवा लाल होणं
– दृष्टी धूसर होणं

काय आहेत याची कारणं ?

– अश्रू नलिकेत अडथळा निर्माण होणं
– कंजक्टीव्हायटीस
– केरॅटीसिस
– ब्लेफॅरिटीस
– डोळ्यांना इजा होणं
– डोळ्यात बाहेरील कचरा जाणं
– पापणीचा सेल्युलायटीस हा गंभीर प्रकार आहे.

काय आहेत यावरील उपचार ?

याच्या कारणांवर याचे अवलंबून असतात. यावरील विविध उपचार पुढीलप्रमाणे –

– कापूस ओला करून कोमट पाण्यानं डोळ्यातील चिपाड किंवा पस स्वच्छ करावा. परंत संसर्ग होऊ नये म्हणून हात स्वच्छ धुवावेत.
– डोळ्यांना किंवा पापण्यांना सतत हात लावू नये. डोळ्यांचा मेकअप टाळावा.
– संसर्गित प्रकरणात अँटीबायोटीक्स किंवा अँटीव्हायरल आय ड्रॉप्स सुचवले जातात.
– जर चिपाड जमा होण्याचं प्रमाण जास्त असेल तर कॉन्टॅक्ट लेंस वापरू नये. याऐवजी चष्म्याचा वापर करावा.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.