डोळे दुखणं म्हणजे नेमकं काय ? ‘ही’ याची लक्षणं, कारणं अन् उपाय !

डोळे दुखणं म्हणजे काय ?

ओप्थल्मल्जिया हा डोळ्यांना होणार एक त्रास आहे. याला डोळे दुखणं म्हणतात. हा त्रास किंवा वेदना ऑक्युलर (डोळ्याच्या पृष्ठभागावर) किंवा ओर्बिटल (डोळ्याच्या आत) असू शकतो. या वेदना गंभीरही असू शकतात. यावेळी वेळीच उपचार करावेत. नाहीतर डोळे जाण्याचीही शक्यता असते.

काय आहेत याची लक्षणं ?

– डोळे दुखणं या प्रमुख लक्षणासह इतर अनेक लक्षणं दिसतात.
– दृष्टीत अडथळा.
– तीव्र वेदनेत लहान मुलं रडतात.
– ताप
– डोळे बाहेर येणं
– दृष्टीतील स्पष्टता कमी होणे
– उलट्या
– खोकला
– पसचा स्त्राव

काय आहेत याची कारणं ?

– संसर्ग
– एखादी इजा
– अॅलर्जी
– अश्रू नलिकेत अडथळा
– डोकेदुखी
– आयरिसची चुरचुर होणं
– डोळ्याचा पांढरा भाग चुरचुरणं
– स्टाय
– कंजंक्टीव्हायटीस
– ग्लॉकोमा
– कॉर्निया चुरचुरणं

काय आहेत यावरील उपचार ?

– ओव्हर द काऊंटर वेदनाशामकं वापरून सतत होणाऱ्या वेदना कमी केल्या जाऊ शकतात.
– सिलियरी स्नायूत होणारं आकुंचन टाळण्यासाठी आय ड्रॉप्स दिले जातात. याच्यामुळं डोळ्याचा लालसरपणा आणि वेदना कमी होतात.
– संसर्ग बर होण्यासाठी अँटीमायक्रोबियल आय ड्रॉप्स दिले जातात.
– डोळ्यांची चुरचुर कमी होण्यासाठी स्टेरॉईड्स दिले जातात.