चेहऱ्याचा पॅरेलेसिस म्हणजे काय ? काय आहेत याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ ?

चेहऱ्याचा पॅरेलेसिस म्हणजे काय ?

जर चेहऱ्याच्या शिरेला हानी पोहोचून त्यामुळं जी वैद्यकीय अवस्था उद्भवते त्याला चेहऱ्याचा पॅरेलेसिस म्हणतात. यामुळं रुग्णाला चेहऱ्यावर हावभाव व्यक्त करता येत नाही किंवा चेहऱ्याची हालचाल करता येत नाही. व्यवस्थित खाता किंवा पिताही येत नाही.

काय आहेत याची लक्षणं ?

– पापण्या बंद करता येत नाहीत
– चेहऱ्याची हालचाल करता न येणं
– तोंड खाली ओघळणं
– चेहऱ्याच्या संरचनेचा तोल सांभाळता न येणं
– व्यक्तीला भुवया उंचावता येत नाही.
– बोलण्याची किंवा खाण्याची क्रिया करण्यास अवघड जातं.
– चेहऱ्याच्या एकूण हालचाली करण्यास अवघड जाणं

काय आहेत याची कारणं ?

चेहऱ्याचा पॅरेलेसिस अचानक किवा किंवा कालांतरानं होऊ शकतो. चेहऱ्याच्या पॅरेलेसिसची सर्वसाधारण कारणं पुढीलप्रमाणे –

– चेहऱ्याच्या शिरांना संसर्ग किंवा त्या सुजणं
– डोक्यात गाठ होणं
– मानेत गाठ होणं
– स्ट्रोक
– आघात किंवा ताण
– बेल्स पाल्सी
– चेहऱ्याला इजा होणं
– लाईम रोगांचा संसर्ग
– विषाणूंचा संसर्ग
– वॅस्क्युलिटीस सारखे ऑटोइम्युन रोग
– चुकीच्या पद्धतीनं केली गेलेली दातांवरील प्रक्रिया ज्यामुळं चेहऱ्याच्या शिरेची हानी होते.
– दुर्मिळ बाबतीत जन्मत:च काही बाळांना चेहऱ्याचा पॅरेलेसिस झालेला असतो (जो नंतर बरा होतो)

काय आहेत यावरील उपचार ?

1) शारीरिक/ वाचा थेरपी
2) चेहऱ्याच्या स्नायूंच्या प्रक्षिशणाचा उपचार
3) चेहऱ्याच्या स्नायूंचे नियंत्रण सुधारण्यासाठी बायोफिडबॅक प्रशिक्षण
3) चेहऱ्याला झालेल्या इजेमुळं चेहरा खराब झाला असेल तर डोळे मिटता यावेत म्हणून प्लास्टीक सर्जरी
4) उच्चरक्तदाब यासारख्या अंतर्गत कारणांसाठी विशिष्ट औषधं दिली जातात.