नाकाचे फ्रॅक्चर म्हणजे काय, जाणून घ्या 7 लक्षणे, ‘या’ कारणांमुळे होते ही समस्या

पोलीसनामा ऑनलाइन – नाकातील फ्रॅक्चरला नाक तुटणे असेही म्हणतात. या स्थितीत, नाकाचे हाड आणि नाकाच्या हाडाला जोडणार्‍या कार्टिलेज (कूर्चा) मध्ये गॅप पडते. हा गॅप प्रामुख्याने नाक विभागणार्‍या ठिकाणी पडतो.

ही आहे लक्षणे
1 नाकास स्पर्श झाल्यास वेदना होतात.
2 नाक आणि चेहर्‍यावर सूज येणे.
3 नाक आणि डोळ्याखाली निळे दिसणे.
4 नाकातून रक्तस्त्राव होणे.
5 नाकाच्या आकारात विकृती.
6 नाकास स्पर्श केल्यावर हाडांचा आवाज येणे.
7 श्वास घेण्यात अडचण येणे इ.

ही आहेत कारणे
नाकाच्या फ्रॅक्चरची कारणे सामान्य असतात म्हणजे खेळ (उदा. हॉकी किंवा फुटबॉल), हाणामारी, वाहनांचा अपघात, पडणे आणि दुखापत होणे ही सामान्य कारणे आहेत.

निदान पद्धती
नाकाच्या फ्रॅक्चरची डॉक्टर तपासणी करताना, नाकाच्या वरच्या आणि आतील भागांची तपासणी केली जाते. याशिवाय एक्स-रे आणि सीटी स्कॅनद्वारे नाकातील फ्रॅक्चर तपासले जाते.

उपचार पद्धती
नाकाचे फ्रॅक्चर होते तेव्हा डॉक्टर हातांनी नाकाचा आकार ठिक करण्याचा किंवा शस्त्रक्रियेद्वारे फ्रॅक्चर ठिक करण्याचा प्रयत्न करतात. 14 दिवसांपेक्षा कमी कालावधी झाला असेल तर डॉक्टर शस्त्रक्रियेशिवाय हाताने ठिक करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जर गंभीर दुखापत झाली असेल तर डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्ला देतात.