हिरड्यांना सूज येणं म्हणजे काय ? काय आहेत याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ ?

पोलीसनामा ऑनलाइन

हिरड्यांना आलेली सूज म्हणजे काय ?

हिरड्यांना सूज येणं म्हणजे दातावर प्लाक तयार झाल्यानं होणारा इंफ्लेमेटरी आजार आहे. यालाच जिंजीव्हायटीस असंही म्हणतात. प्लाक हा नैसर्गिक चिकट द्रवासारखा पदार्थ आहे, ज्यात बॅक्टेरिया असतात व जो दाताच्या पृष्ठभागावर जमा होतो. प्लाक हा दाताच्या मधल्या भागातही जमा होऊ शकतो. जर वेळीच याची काळजी घेतली नाही तर यामुळं हिरड्यांना धोका निर्माण होऊ शकतो. यामुळं दातांचंही नुकसान होतं.

काय आहेत याची लक्षणं ?

– लाल व सुजलेल्या हिरड्या
– हिरड्यांमधून रक्तस्त्राव
– हिरड्या दुखणं
– श्वासातून दुर्गंध
– थंड किंवा गरम खाद्य पदार्थांबद्दल संवेदनशीलता
– दात खिळखिळे होणं

काय आहेत याची कारणं ?

– प्लाक तयार होणं
– तोंडाची योग्य स्वच्छता नसणं
– धूम्रपान व तंबाखू सेवन
– गर्भधारणा
– चुकीचा आहार
– ताण
– मधुमेह, एचआयव्ही संक्रमण, कर्करोग असे आजार
– अँटी एपिलेप्टीक ड्रग्स, कर्करोगाची औषधं, तोंडावाटे गर्भनिरोधक व स्टेरॉईड औषधांचे सेवन.

काय आहेत यावरील उचपार ?

– दिवसातून 2 वेळा दात घासणं
– दिवसातून एकदा नीट प्लॉसिंग करणं
– नियमित माऊथ वॉश करा.
– काही रंग बदलासाठी तुमच्या हिरड्या नियमित तपासा
– नियमित दातांची तपासणी करा.