‘क्यू’ ताप म्हणजे काय ? जाणून घ्या ‘ही’ 12 लक्षणे आणि उपचाराविषयी माहिती

क्यू फीवर एक असामान्य बॅक्टेरियाचा संसर्ग आहे, जो प्राण्यांपासून व्यक्तींमध्ये पसरतो. हे तीव्र आणि दीर्घकालीन दोन्ही असू शकते. दीर्घकालीन बाबतीत रुग्णासाठी प्राणघातक ठरू शकतो. मेंढी व बकरी यांना या आजाराची लागण होण्याची शक्यता असते, परंतु मासे, कुत्री, उंट यांनाही या जिवाणूची लागण होऊ शकते.

लक्षणे कोणती?
1 ताप, 2 सर्दी, 3 घाम येणे, 4 थकवा, 5 डोकेदुखी, 6 स्नायू दुखणे, 7 मळमळ, 8 उलट्या, 9 अतिसार, 10 छातीत दुखणे, 11 पोटदुखी, 12 वजन कमी होणे.

क्यू तापाच्या संसर्गाने दहापैकी पाचजण आजारी पडतात. जेव्हा बॅक्टेरियाचा संसर्ग होतो तेव्हा दोन ते तीन आठवड्यात या आजाराची लक्षणे जाणवू लागतात.

हा आजार का होतो?
कोक्सीएला बर्नेटीमुळे क्यू ताप येतो. हा जीवाणू सामान्यतः मेंढ्या आणि बकर्‍यांमध्ये आढळतो. याव्यतिरिक्त, हा बॅक्टेरिया मांजरी, कुत्री आणि ससे यासारख्या घरगुती प्राण्यांना देखील संक्रमित करतो. मल, मूत्र, दूध किंवा अ‍ॅम्निओटिक फ्लुइड किंवा संक्रमित प्राण्यांच्या प्लेसेंटाद्वारे बॅक्टेरिया संक्रमित करतो.

यावरील उपचार काय आहे?
क्यू तापाचे निदान करण्यासाठी डॉक्टर अनेक प्रकारच्या रक्त चाचण्या करतात. रोगाचा शोध घेण्यासाठी खालील टेस्ट केल्या जातात.

1 सेरोलॉजिकल टेस्ट, 2 प्लेटलेट काउंट, 3 इकोकार्डिओग्राम

क्यू फीव्हरची सौम्य लक्षणे योग्यवेळी उपचार केल्या काही आठवड्यामध्ये रूग्य बरे होतात, तर गंभीर लक्षणांमधे डॉक्टर रुग्णाला प्रतिजैविक औषधे देतात. हा उपचार दोन ते तीन आठवड्यापर्यंत करावा लागू शकतो. क्यू तापाचा दीर्घकाळ संसर्ग असल्यास, रुग्णाला 18 महिन्यांपर्यंत प्रतिजैविक औषध दिले जाते.