मुलं वारंवार आजारी पडतायत ? घरच्या घरीच करा ‘हे’ 5 सोपे उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   थंडीत किंवा इतर वेळी देखील मुलं जर सतत आजारी पडत असतील तर याचा अर्थ असा आहे की त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे. वेळीच त्यांच्या आरोग्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणते पदार्थ जास्त फायदेशीर ठरतात हे आपण जाणू न घेणार आहोत.

1) डेअरी प्रॉडक्ट्स – डेअरी प्रॉडक्ट्सचा मुलांच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप फायदा होतो. थंडीत दूध आरोग्यदायी ठरतं. दुधासोबतच दुधाच्या पदार्थांचाही खूप फायदा होतो. दुधासोबतच दही, पनीर यांचाही शरीराला खूप लाभ होतो.

2) हळद – हळद इम्युनोमॉड्युलेटरी क्षमतेला वाढवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यातील कर्क्युमिन एखाद्या अँटी ऑक्सिडेंट प्रमाणे काम करतं. रात्री झोपताना हळदीच्या दुधाचा खूप फायदा होतो.

3) मशरूम – यात असणाऱ्या व्हिटॅमिन डी आणि अँटी ऑक्सिडेंटमुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जर मुलांना मशरूम आवडत नसेल तर तुम्ही भाजी किंवा सँडविच बनवून त्यांना देऊ शकता. मशरूम सूप हा देखील एक उत्तम पर्याय आहे.

4) ड्राय फ्रुट्स – मुलं अनेकदा फळं आणि भाज्या खाण्यास नकार देतात. अशात तुम्ही त्यांना काजू, बदाम, खजूर, अक्रोड, मनुके असे नट्स देऊ शकता. यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि अँटी ऑक्सिडेंट्स असतात. यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

5) व्हिटॅमिन सी – बॅक्टेरिया आणि इंफेक्शनपासून बचाव करण्यासाठी याची खूप मदत होते. जांभूळ, चेरी आणि पेरूत याचं प्रमाण जासत असतं. यालाच अस्कॉर्बिक अॅसिडही म्हणतात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like