Diseases Faced By Women At 30 | 30 वय ओलांडताच महिलांमध्ये वाढतो ‘या’ आजारांचा धोका, जाणून घ्या कशी घ्यावी स्वताची काळजी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diseases Faced By Women At 30 | वयाच्या 30 वर्षानंतर प्रत्येक महिलने स्वतःची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण, वयानुसार महिलांच्या शरीरात बदल होत असतात. या बदलांनुसार, त्यांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्यामुळे ते अनेक आजारांना बळी पडतात. (Diseases Faced By Women At 30)

 

वयाची तिशी ओलांडल्यानंतर आरोग्याबाबत (Health) अधिक जागरूक असले पाहिजे. खरं तर या काळात हार्मोन्समध्ये होणार्‍या बदलांमुळे डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होतो, केस पांढरे होणे, थकवा येणे आणि चेहर्‍यावर बारीक रेषाही तयार होतात. (Diseases Faced By Women At 30)

 

हे वय पार करताच शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासते. त्यामुळे स्नायूंमध्ये लवचिकता, हाडे कमकुवत होणे, एनर्जी कमी होणे इत्यादी समस्या होतात. 30 वय ओलांडल्यानंतर कोणते आजार होण्याची शक्यता वाढते ते जाणून घेवूयात.

 

इन्फर्टिलिटी :
स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ. लवली जेठवानी यांनी म्हटले की, सर्वसाधारणपणे वयाची 30 वर्षे ओलांडल्यानंतर महिलांची प्रजनन क्षमता कमी होऊ लागते. वय वाढले की ती आणखी कमी होते. अशा स्थितीत महिलांनी योग्य वयातच फॅमिली प्लॅनिंग करायला हवे.

 

जर हे कारणास्तव शक्य नसेल तर आरोग्याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून इन्फर्टिलिटी समस्या टाळता येईल. यासाठी योग्य आहार, जीवनशैली (Diet, Lifestyle) यांचा समतोल राखून प्रजनन क्षमता टिकवून ठेवू शकता. धूम्रपान आणि मद्यपान (Smoking, Alcohol) देखील टाळले पाहिजे.

प्रीमॅच्योर ओव्हरी फेल्युअर :
डॉ. लव्हली यांच्या मते, जेव्हा अंडाशय सामान्य प्रमाणात इस्ट्रोजन हार्मोन तयार करत नाहीत किंवा अंडी त्यांच्या नियोजित वेळेवर बाहेर पडत नाहीत, तेव्हा प्रीमॅच्योर ओव्हरी फेल्युअर होण्याचा धोका असतो. हे सहसा मेनोपॉज दरम्यान होते. (Diseases Faced By Women At 30)

 

मात्र, आपल्या देशात 30 ते 40 वयोगटातील प्रीमॅच्युर ओव्हरी फेल्युअरचे प्रमाण 0.1 टक्क्यांपर्यंत दिसून येते. पण बदलती जीवनशैली, कामाचा ताण यामुळे या वयातील 25 टक्के महिलांना सतत अनियमित मासिक पाळीच्या समस्येने त्रस्त असतात.

 

इतर आजार :
30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी PCOS बद्दल अधिक सतर्क राहिले पाहिजे. खरे तर उशिरा लग्न झाल्यामुळे महिलांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सचे संतुलन बिघडू लागते. PCOS रुग्णांमध्ये, हार्मोनल असंतुलनामुळे अंडाशयात लहान गाठ तयार होते.

 

त्यावर वेळीच उपचार होणे अत्यंत गरजेचे असते. फायब्रॉइड्स ही एक प्रकारची गाठ आहे जी गर्भाशयात होते.
ही गाठ स्नायूंच्या पेशींनी बनलेली असते, जी कॅन्सरस (Cancer) असते. 30 ते 50 वयोगटातील महिलांना फायब्रॉइड होण्याची शक्यता असते.

अशी काळजी घ्या :
जसजसे वय वाढते, इस्ट्रोजेनची पातळी कमी होते. ज्यामुळे हाडांच्या घनतेवर परिणाम होतो.
अशावेळी दूध, दही, चीज, ब्रोकोली, बदाम (Milk, Yogurt, Cheese, Broccoli, Almonds) इत्यादींचे सेवन करावे.
वयाच्या 30व्या वर्षी महिलांनी लोहयुक्त पदार्थ जसे की वाटाणे, भोपळ्याच्या बिया, हिरव्या भाज्या, मनुका इ. सेवन करावे.
हाडांसाठी व्हिटॅमिन डी (Vitamin D) सोबत कॅल्शियमचे (Calcium) सेवन करणे आवश्यक आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diseases Faced By Women At 30 | common health diseases faced by women in age of 30s know how to take care of yourself

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Daibetes – Milk | डायबिटीजमध्ये दूध प्यायल्याने रुग्णांची ब्लड शुगर वाढू शकते का? जाणून घ्या काय आहे सत्य

Winter Care | हिवाळ्यात मुलांची घ्या विशेष काळजी, जाणून घ्या कसे ठेवावे गरम आणि आजारांपासून सुरक्षित

Health Tips | जेवल्यानंतर ताबडतोब झोपण्याची सवय आहे का? मग व्हा सावध! होऊ शकतात हे गंभीर आजार