Diseases that are hard to diagnose | डॉक्टरांना देखील होत नाही ‘या’ 7 आजारांचं सहजपणे ‘निदान’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diseases that are hard to diagnose | जेव्हा तुम्हाला एखाद्यावेळी विचित्र वेदना जाणवते, तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता, तुम्हाला अपेक्षा असते की डॉक्टर ताबडतोब आजार ओळखून उपचार सांगू शकतात. मात्र, तुम्ही ऐकून हैराण व्हाल की, रूग्णांची काही लक्षणे डॉक्टरांना सुद्धा लवकर समजत नाहीत. असे कोणते आजार आहेत ज्यांचे निदान करताना डॉक्टरसुद्धा अनेकदा चक्रावतात ते जाणून घेवूयात. (Diseases that are hard to diagnose)

1. इरिटेबल बाऊल सिंड्रोम (irritable bowel syndrome) –
इरिटेबल बाऊल सिंड्रोम झाल्यास पोटाच्या खालच्या भागात वेदना होतात आणि बाथरूमला जाण्याच्या सवयीत बदल होतो, जो तीन महिन्यापर्यंत राहतो. डॉक्टरांना याबाबत योग्य माहिती शोधण्यास वेळ लागतो कारण त्यांना हे सुद्धा शोधावे लागते की, हा लॅक्टोज इन्टॉलरन्स, सीलिएक डिसीज किंवा एखादे बॅक्टेरियल इन्फेक्शन तर नाही ना.

2. सीलिएक डिसीज (celiac disease) –
गहू, जव आणि मोहरीमध्ये आढळणारे ग्लूटेन प्रोटीन काही लोकांना पचत नाहीत आणि यामुळे पचनक्रिया बिघडते. यामुळे नेहमी डायरिया, थकवा आणि वेटलॉस होऊ लागते. तसेच सांधेदुखी, चट्टे, डोकेदुखी, डिप्रेशन आणि फिट सुद्धा येऊ शकते. ही सर्व लक्षणे अल्सर, क्रोहन्स डिसीज आणि इरिटेबल बाऊल सिंड्रोमची सुद्धा आहेत. यासाठी डॉक्टरांना ब्लड टेस्ट आणि आतड्याच्या एका छोट्या तुकड्यातून सीलिएक डिसीजचे निदान होते.

3. अपेन्डिसायटिस (appendicitis) –
हा तेव्हा होतो जेव्हा तुम्हाला अपेंडिक्स (आतड्याशी जोडलेली छोटी पिशवी) ला सूज येते. यामुळे बेंबीच्या आजूबाजूला जास्त वेदना होतात. हे अचानक सुरू होते आणि हळुहळु वेदना खालच्या बाजूला वाढत जातात. यामुळे मळमळ, उलटी, ताप, बद्धकोष्ठता होऊ शकते. अपेन्डिसायटिसचे निदान डॉक्टरांना ताबडतोब होऊ शकत नाही. कारण अशी लक्षणे क्रोहन्स डिसीज, पेल्विकमध्ये सूज आणि कोलायटिसमध्ये सुद्धा जाणवतात. अपेन्डिसायटिसचे निदान करण्यासाठी डॉक्टरांना काही शारीरीक तपासण्या कराव्या लागतात.

4. हायपोथायरायडिज्म (hypothyroidism) –
जेव्हा थायरॉईड खुप जास्त थायरोक्सिन हार्मोन बनवू लागते तेव्हा अशी स्थिती होते. नर्व्हस, त्रस्त आणि चिडचिडेपणा जाणवतो. यामध्ये एकप्रकारचा मूड डिसऑर्डर असतो. हृदयाची धडधड वाढणे, अचानक वेटलॉससारखी लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांना सांगा. ब्लड टेस्टद्वारे डॉक्टर हे शोधू शकतात की, हायपोथायरायडिज्म आहे किंवा नाही.

5. स्लीप अ‍ॅपनिया (sleep apnea) –
असे तेव्हा होते जेव्हा झोपल्यावर तुमचा श्वास थांबतो आणि आपोआप सुरू होतो. यामुळे तोंड सुकणे, घशात खवखव, सकाळी डोकेदुखी आणि चिडचिडेपणा होतो. मात्र ही सर्व लक्षणे फ्लू, कोल्ड किंवा इतर स्थितीची सुद्धा असू शकतात. याचे निदान करण्यासाठी डॉक्टरांना स्लीप स्टडी करावा लागतो. ज्यामध्ये रूग्णाची ब्रेन अ‍ॅक्टिव्हिटी, हार्ट रेट, ब्रिथिंग आणि ऑक्सीज लेव्हल तपासली जाते. झोपल्यानंतर घोरता किंवा नाही हे सुद्धा डॉक्टर पाहतात.

6. फायब्रोमायल्जिया (fibromyalgia) –
फायब्रोमायल्जियामध्ये शरीरात भयंकर वेदना होतात. याची कोणतीही टेस्ट नाही.
यासाठी डॉक्टर याचा शोध घेतात की, वेदना गाठ, ल्यूपस किंवा इतर कारणामुळे तर होत नाही ना.
झोपेची समस्या आहे किंवा मानसिक परिणाम झाल्यास डॉक्टर डिप्रेशनचा सुद्धा शोध घेण्याचा प्रयत्न करतात.
या सर्व गोष्टी आढळल्या नाहीत तर डॉक्टर फायब्रोमायल्जियाचा उपचार सुरु करतात.

7. पार्किन्सन्स डिसीज (parkinson’s disease) –
या आजारात मेंदूच्या पेशी त्याप्रमाणे काम करत नाही जसे केले पाहिजे.
यामध्ये हात थरथरणे, मानेत कठिणपणा, संतुलनाची समस्या होऊ शकते,
आणि चेहरा वेगळा दिसू लागतो. मात्र, हे स्ट्रोक, डोक्याला दुखापत, अल्झायमर रोग आणि इतके की, तणावाचे सुद्धा संकेत आहेत.
याची सुद्धा कोणतीही टेस्ट नाही यासाठी योग्यप्रकारे याचा शोध घेण्यास डॉक्टरांना काहीवर्ष सुद्धा लागतात. (Diseases that are hard to diagnose)

Web Title :- Diseases that are hard to diagnose | conditions that are hard to diagnose symptoms treatment

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SP Leader Ghalib Khan | गांधीजींची मूर्ती पकडून ‘बापू-बापू’ म्हणत रडू लागले ‘सपा’ नेते गालिब, Video पाहून लोक म्हणाले – ‘ऑस्करमध्ये पाठवा’

Dangerous Apps | सावधान ! तुमच्या फोनमध्ये असतील ‘ही’ Apps तर तात्काळ करा डिलिट, Google Play Store ने बॅन केली 136 धोकादायक अ‍ॅप्स

Pune News | सेवा सप्ताहानिमित्त स्वच्छतादूत तसेच पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान