‘व्हिटॅमिन-डी’ ची कमतरात देते ‘या’ 9 आजारांना निमंत्रण, जाणून घ्या.

तुम्हाला थकवा, चिडचिडेपणा आणि अस्वस्थता जाणवते का? ऑफिस मधून येताना तुम्हाला असे वाटते का की बिछान्यावर पडून थेट झोपी जावे. कोणत्याही कामात मन लागत नसेल, चिडचिड होत असेल तर तुमच्यात या जीवनसत्त्वाची कमतरता असू शकते.

व्हिटॅमिन डीची कमतरता अशी आहे, जसे की सर्दी-खोकला होणे. म्हणायला कोणताही रोग नाही, परंतु त्रास सर्व आजारांपेक्षा जास्त आहे. एक प्रकारे ते आपल्या दैनंदिन जीवनाला त्रास देणारे ठरते. व्हिटॅमिन डीची कमतरता दहा आजारांना कारणीभूत ठरू शकते, ते कोणते आजार आहेत जाणून घेवूयात…

व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे सूर्य होय. हे जीवनसत्त्व शरीर व्यवस्थित चालवण्यासाठी खूप महत्वाचे आहे. हे शरीराची प्रतिकारशक्ती व्यवस्थित ठेवते.

या समस्या होऊ शकतात

1 युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरच्या अहवालानुसार व्हिटॅमिन डी शरीराचे कर्करोगापासून संरक्षण करते.

2 व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडांचा आजार होतो.

3 मधुमेह होऊ शकतो

4 उच्च रक्तदाब होण्याचा धोका वाढतो.

5 व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची प्रारंभिक लक्षणे म्हणजे शरीरात वेदना, थकवा, चिडचिड आणि अस्वस्थता.

6 घाम येणे- या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे शरीरात घामाचे प्रमाण वाढवते.

7 व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे नैराश्य वाढते. यासाठी व्हिटॅमिन डी 3 जबाबदार असल्याचे मानले जाते.

8 रोग प्रतिकारशक्ती कमी होते.

9 छातीत धडधड, घाबरणे यासाठी सुद्धा व्हिटॅमिन डी जबाबदार आहे. हे टाळण्यासाठी, योग्य वेळी डॉक्टरांशी संपर्क साधा.