‘Videocon D2h’ आणि ‘Dish TV’ ग्राहकांसाठी ‘खुशखबर’ ! ‘या’ प्लॅनच्या रिचार्जवर मिळवा 2 महिने ‘फ्री’ सेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Dish Tv आणि Videocon D2h आपल्या लॉन्ग टर्म प्लॉनवर एक्स्ट्रा बेनिफिट्स ऑफर देत आहे. दोन्ही कंपन्या आपल्या सेवा 10 महिन्याच्या लॉन्गटर्म प्लॅनवर 2 महिने अतिरिक्त सेवा ऑफर करत आहे. यात 6 महिन्याच्या प्लॅनवर देखील सब्सक्राइबर्सला एक्स्ट्रा सर्विस बेनिफिट्स मिळेल. या दोन्ही कंपन्यांनी मागील वर्षी मर्ज होण्याची घोषणा केली होती.

काय आहे की ऑफर 
डिश टीव्ही आपल्या 10 महिन्याच्या प्लॅनबरोबर 2 महिने एक्स्ट्रा सर्विस ऑफर करत आहे. म्हणजेच 10 महिन्याच्या प्लॅनवर यूजरला 12 महिने सेेवेचा लाभ मिळेल. यात फक्त 10 महिन्याचे पेमेंट करावे लागेल.
यशिवाय 6 महिन्याच्या सब्सक्रिपशनसह 1 महिना एक्स्ट्रा सेवा मिळेल. Videocon d2h आणि dish Tv दोन्हीवर 6 महिन्याच्या सब्सक्रिपशनवर अतिरिक्त 30 दिवसाची फ्री सेवा मिळेल. तसेच 3 महिन्याच्या सब्सक्रिपशनवर अतिरिक्त 14 दिवसाची सेवा फ्री मिळेल. यात D2h बेनिफिट्सच्या स्वरुपात फ्री सेट टॉप बॉक्सची देखील ऑफर आहे.

HD सेट टॉप बॉक्स फक्त 799 रुपयात 
याबरोबर Dish Tv आपल्या ग्राहकांना एक ऑफर देत आहे. यात जे यूजर्स SD सेट टॉप बॉक्सचा वापर करत आहेत, त्यांना फक्त 799 रुपयात HD सेट टॉप बॉक्स मिळेल. यामुळे अनेक ग्राहकांना कंपनी अपग्रेड करेल. यात ग्राहकांना एक माहिन्याचा प्लॅन मिळेल.