फायद्याची गोष्ट ! डिश टीव्ही DTH युजर्ससाठी भन्नाट ऑफर, 4 रूपये महिन्यात खास सर्व्हिस, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   डीटीएच वापरकर्त्यांना एका खुशखबर आहे. अग्रणीची डीटीएच ऑपरेटर असलेली डिश टीव्ही आपल्या ग्राहकांसाठी ‘Dish TV Mega Entertainment Sale’ घेऊन आली आहे. त्यामध्ये कंपनी ४ रुपये मंथली रेंटलवर अ‍ॅक्टिव सर्विस ऑफर ग्राहकांना मिळणार आहे. २८ ऑगस्ट रोजी सुरु झालेल्या सेलचा आज अखेरचा दिवस आहे.

अवघ्या ४ रुपयांत खरेदी करा आवडीचे चॅनेल

डिश टीव्ही इंटरटेनमेंट ऑफर लाईव्ह असून, त्यामध्ये कंपनी ४ रुपयांच्या मंथली चार्जवर ग्राहकांना एकूण २० अ‍ॅक्टिव सर्विसमध्ये आपल्या आवडीचे चॅनेल निवड करण्याची संधी आहे. डिश टीव्हीला अॅक्टिव सर्विसचे टार्गेट आहे.

इतर दिवशी मोजावे लागतात ५.६ रुपये

ग्राहकांना या सर्विससोबत खूप नवीन स्किल्स शिकायला मिळतात. ग्राहकांना ही सर्विस ५.६ रुपये प्रति दिवस या प्रमाणे मिळत होती. पण या खास ऑफर च्या माध्यमातून ४ रुपये मंथली रेंटल वर ऑफर दिली जात आहे.

असे करा अ‍ॅक्टिव आवडीचे चॅनल

आपणास जर कुकिंगची आवड असेल तर तुम्ही मंथली ४ रुपये रेंटलवर कुकिंग अॅक्टिव चॅनेलला निवडू शकता. जर तुम्हाला अ‍ॅक्टिव चॅनेलला सब्सक्राईब करायचे असेल तर तुम्ही आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबर वरुन १८००-२७०-०२८३ यावर मिस्ड कॉल करावा लागेल.

कॉन्टेंटची ची गुणवत्ता चांगली

डिश टीव्ही आपल्या ग्राहकांना अनेक अॅक्टिव चॅनेल्स ऑफर करत आहे. यामागे चॅनलचे प्रयत्न असतात की, ग्राहकांना मनोरंजन कॉन्टेंट दिसेल. जर तुम्हाला चित्रपटाची आवड असेल तुम्ही मूव्हीज अॅक्टिवला सब्सक्राईब करु शकता. डिश टीव्हीचे मोठ्या प्रमाणात अॅक्टिव चॅनल्स शेमारूचे असल्याने त्याची कॉन्टेंटची गुणवत्ता चांगली मिळते.