अभिनेत्री दिशा पाटनीचे फोटो सोशलवर ‘व्हायरल’ ; पुन्हा दिसली ‘हॉट’ अंदाजात !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड हॉट आणि क्युट अ‍ॅक्टरेस दिशा पाटनी नेहमीच चर्चेत असते. दिशाच्या हॉटनेसमुळे तिचे चाहते तिचे दिवाणे आहेत. ती जितकी क्युट दिसते तितकीच तिची अदा बोल्ड आहे. खूप कमी दिवसात बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणारी दिशा आपले हॉट फोटोज सोशल मीडियावर शेयर करत असते. या फोटोजमुळे ती अनेकवेळा ट्रोल देखील झाली आहे. परंतु, दिशाला या गोष्टींचा काही फरक पडत नाही ती तिच्या मर्ज़ीप्रमाणे जगत असते.

नुकताच दिशाने सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला आहे. या फोटो मध्ये दिशा खूप हॉट दिसत आहे. ब्लॅक लुक मध्ये दिसत असणाऱ्या दिशाने फक्त शॉर्ट पॅन्ट घातली आहे. १४ तासांपूर्वी शेयर केलेल्या या फोटोला आत्तापर्यंत १ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.

सध्या तिला इंस्टावर २१ मिलियन पेक्षा जास्त लोक फॉलो करत आहेत. दिशाचा हा लुक ‘भारत’ चित्रपटानंतरचा आहे. ‘भारत’ चित्रपटाच्या यशामुळे दिशा नक्कीच खुश झाली असणार. दिशा सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती नेहमी आपले फोटोज सोशल मीडियावर शेयर करत असते आणि तिच्या चाहत्यांना खुश करते.