Top 50 इंडियाज मोस्ट डिजायरेबल वूमनच्या लिस्टमध्ये नंबर 1 दिशा पटाणी

मुंबई : दिशा पटाणी आपले सौंदर्य आणि फिटनेससाठी ओळखली जाते. ती त्या अ‍ॅक्ट्रेसपैकी एक आहे, ज्यांनी खुप कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये चांगली ओळख निर्माण केली आहे. एका ऑनलाइन सर्वेनुसार दिशा 2019 ची मोस्ट डिजायरेबल वूमन बनली आहे. तिने आपले हे यश एका पोस्टद्वारे शेयर केले आहे.

द टाइम्स ऑफ इंडिया ऑनलाइन सर्वेमध्ये दिशाने मोस्ट डिजायरेबल वूमन ऑफ 2019 मध्ये पहिले स्थान मिळवले आहे. तिने पोस्ट शेयर करून आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. सर्वेत भारतीय फिमेल सेलिब्रिटीजचे टॉप 50 चे रँकिंग देण्यात आले आहे, ज्यामध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रातील आहे. या सर्वेत सेलेब्सचा लुक, कॉन्फिडन्स, टॅलेंट आणि स्टाइलनुसार स्थान दिले आहे.

दिशाने हे सर्व फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेयर केले आहेत. यासोबतच तिने लिहिले आहे की, – माझ्या प्रिय चाहत्यांचे या अनकंडिशनल प्रेमासाठी खुप धन्यवाद. मोस्ट डिजायरेबल वूमनच्या टॉप 50 लिस्टमध्ये दिशाला नंबर 1 मिळणे खूप मोठे यश आहे.

दिशा आपला लुक आणि फिटनेससाठी यापूर्वीही खुप चर्चेत आलेली आहे. ती नेहमी वर्कआउट सेशन्सचे व्हिडिओ शेयर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने 80 किलो वजन उचलताना एक व्हिडिओ शेयर केला होता.