दिशा पाटनीचा बिकिनी फोटो व्हायरल, दोन तासांत 13 लाखाहून अधिक लाईक्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटनीचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत आणि तिचे फोटो खूपच पसंत केले जातात. फिटनेस फ्रीक दिशा बर्‍याचदा फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. दिशाने आता यलो बिकीनीमध्ये एक फोटो पोस्ट केला आहे, ज्याला अवघ्या दोन तासांत 13 लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये दिशा समुद्राच्या मध्यभागी असलेल्या सर्फ बोर्डवर उभी असल्याचे दिसली असून तिच्या हातात एक काठी आहे. दिशाने या फोटोसह लिहिले – अक्वॅमन सारखी फीलिंग येत आहे. फोटोमध्ये दिशाची परफेक्ट फिगर दिसत आहे. दिशाच्या फोटोवर, सर्व चाहत्यांनी कमेंटमध्ये फायरचे इमोजी बनवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दिशाची जोरदार फॅन फॉलोइंग आहेे, जे तिला नॅॅशनल क्रश म्हणून संबोधतात.

दिशा अनेकदा तिच्या वॅकेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करते. दिशाच्या कारकीर्दीबद्दल बोलताना ती आदित्य रॉय कपूर सोबर या वर्षाच्या सुरुवातीला मलंग मध्ये दिसली होती. या चित्रपटामध्ये दिशाने मुख्य भूमिका साकारली होती. अनिल कपूर देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. पुढच्या वर्षी दिशा राधेेे यूवर मोस्ट वॉन्टेड भाईमध्ये सलमान खान सोबत दिसणार आहे. पुढच्या वर्षी ईदला हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकेल असे सलमानने 27 डिसेंबर रोजी म्हणजेच वाढदिवसा दिवशी सांगितले होते. दिशाने सलमानबरोबर भारत मध्ये काम केले आहे.

दिशा टायगरशी दीर्घ काळापासून रिलेशनशिपमध्ये आहे. त्याच्या कुटूंबासह ती सुट्टीवर देखील जाते. मात्र, या दोघांनी कधीही त्यांच्या नात्यावर जाहीरपणे भाष्य केले नाही. दिशाने टायगर सोबत बागी 2 मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. बागी 3 मधील एका गाण्यात तिने खास ॲपिरन्स दिला. दिशाने एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरीमध्ये क्रिकेटरच्या मैत्रिणीची भूमिका केली होती, जिचा अपघातात मृत्यू झाला. टायगरची बहीण कृष्णाबरोबर दिशाचे चांगले नाते आहे आणि त्या बर्‍याचदा एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करतात.