अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनीनं शेअर केला ब्लॅक बिकीनीतील ‘SEXY’ फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची क्युट अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनी आपल्या फिटनेससाठी खूप फेमस आहे. आपल्या लुकला घेऊन सोशलवर ती नेहमीच चर्चेत असते. सोशलवर सक्रिय असणारी दिशा पाटनी आपले अनेक हॉट आणि बोल्ड फोटो सोशलवर शेअर करत असते. पुन्हा एकदा दिशाच्या एका सेक्सी फोटोनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दिशाचा हा फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहे. यात दिशा कमालीची हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या आपल्या नवीन सेक्सी फोटोमध्ये दिशा पाटनी ब्लॅक बिकीनीत दिसत आहे. दिशा स्विमिंग पूलाच्या किनारी बसल्याचं दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर खूपच क्युट एक्सप्रेशन दिसत आहे. परंतु तिची पोज खूपच सेक्सी आहे. आपल्या हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ कसं करायचं हे दिशाला चांगलंच माहिती आहे.

सध्या दिशा थायलंडला सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याआधीही दिशानं येलो क्रॉप टॉपमधील फोटो शेअर केला होता. यावेळी तिनं प्लाझोही घातला होता. यात दिशा खूपच सुंदर दिसत होती.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती मलंग सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती आदित्य रॉय कपूर आणि अनिल कूपरसोबत दिसणार आहे. हा सिनेमा मोहित सुरी डायरेक्ट करत आहेत. फेब्रुवारी 2020 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.