‘या’ गाण्यातून घेतली आहे Baaghi 3 मधील दिशा पाटनीच्या Do You Love me ची ‘धून’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अलीकडेच बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर स्टारर बागी 3 सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. जेव्हापासून सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे सिनेमानं माहोल तयार केला आहे. टायगरची बॉडी, अ‍ॅक्शन सीन, श्रद्धाचा बोल्ड अवतार चाहत्यांना भावताना दिसत आहे. अलीकडेच सिनेमातील गाणं Do you Love Me चा टीजर लाँच झाला. हे गाणं दिशाचं आयटम नंबर आहे. टीजरमध्ये दिशाच्या काही मुव्स करताना दिसत आहेत.

Do you Love Me गाण्याचं म्युझिक तनिष्क बगचीनं तयार केलं आहे. आदिल शेखनं हे गाणं कोरियोग्राफ केलं आहे. या गाण्यात बॉलिवूडमधील कोणत्या गाण्याची नाही, तर ट्रॉयबोई च्या डू यू या गाण्याची कॉपी केली आहे. 2015 मध्ये या गाण्यानं इंटरनॅशनल लेवलला धुमाकूळ घातला होता. Do you Love Me या गाण्याचा व्हिडीओदेखील या अंदाजातच शुट करण्यात आला आहे. सुरुवातीचे बोल सोडले तर नंतर यात हिंदी बोल अ‍ॅड केले आहेत.

Do you Love Me या गाण्यात दिशा कमालीची हॉट दिसत आहे. दिशाचा मलंग सिनेमाही नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमतही ती बिकीनीत दिसली होती. परंतु दिशाचा हा लेटेस्ट अंदाज पाहिल्यानंतर मात्र चाहते दिशाचा मलंगमधील लुकही विसरतील. बागी 3 हा सिनेमा 6 मार्चला रिलीज होणार आहे. असंही होऊ शकतं की, रिलीजनंतर चाहते टायगर आणि श्रद्धा कपूरपेक्षाही दिशा पाटनी आणि टायगरबद्दलच जास्त चर्चा करतील.

View this post on Instagram

🖤💙

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

View this post on Instagram

Uski aankhon mein baatein ❤️🖤 @shraddhakapoor

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

View this post on Instagram

🖤💙#dusbahanekarkelegayi❤️ @shraddhakapoor

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

You might also like