दिशा पाटनीचा ‘हा’ व्हिडीओ बघून चाहते म्हणाले असं काही…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी सध्या सोशल मीडियावर खूप झळकत आहे. आणि तिच्या चाहत्यांच्या मनात घर करत आहे. ती नेहमी तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी शेयर करत असते. आता पुन्हा एकदा तीने सोशल मीडियावर एक बटरफ्लाय स्टंट मारण्याचा सराव केला आणि व्हिडीओ शेयर केला आहे.

तिने अतिशय अप्रतिमरित्या बटरफ्लाय किक मारण्याचा प्रयत्न केला आहे. दिशेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा विडिओ व्हायरल करताना लिहिले की, ‘ट्रेनिंग करणं जमलं नाही. अजून बटरफ्लाय किक मारण्याचा मी प्रयत्न करते आहे आणखी मला पूर्ण जमले नाही मी शिकण्याचा प्रयत्न करते आहे. दिशाने हा व्हिडिओ शेयर करताच तिच्या चाहत्यांनी कंमेंटचा वर्षाव केला.

दिशाचा विडिओ बघितल्यानंतर एका नेटकऱ्याने लिहिला की, ‘हा टायगरसोबत राहण्याचा परिणाम आहे.’ दिशा पाटनी पुन्हा एकदा एका चित्रपटामध्ये सलमान खान आणि कतरिना कैफसोबत ‘भारत ‘ चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात ती फारच मादक दिसू येत आहे. दरवर्षी सलमान खान ईदला एक चित्रपट प्रदर्शित करत असतो यावेळेस सुद्धा तो ‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित करत आहे. या आधी दिशा पाटनीने टायगर श्रॉफसोबत ‘बागी २’ हा चित्रपट केला आहे. दोघांनी सोबत पहिल्यांदाच चित्रपटामध्ये काम केले आहे. ‘बागी’ प्रमाणेच ‘बागी २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या नजरेत आला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like