‘बागी 3’ मध्ये दिशा पाटनी करणार ‘आयटम’ नंबर, सोबत थिरकणार ‘टायगर’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार दिशा पाटनी बागी 2 सिनेमात अभिनेता टायगर श्रॉफसोबत झळकली होती. यात तिची प्रमुख भूमिका होती. पंरतु आता पुन्हा एकदा दिशा बागी 3 या आगामी सिनेमात दिसणार आहे. परंतु यावेळी तिचा लिड रोल नसून सिनेमात ती आयटम नंबर करताना दिसणार आहे. लवकरच याची शुटींग सुरू होणार आहे.

पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, दिशा पाटनी बागी 3 मध्ये एका गाण्यात दिसणार आहे. या डान्स नंबरमध्ये दिशा एकटी असणार की तिच्या सोबत टायगर श्रॉफ दिसणार आहे याचा खुलासा अद्याप झालेला नाही. रिपोर्टनुसार, दिशाचा हा डान्स नंबर सिनेमाच्या महत्त्वाच्या भागांपैकी एक आहे. गाण्यानंतर सिनेमाची स्टोरी पुढे जाणार आहे.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती आपला आगामी सिनेमा राधेच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती सलमान खानसोबत काम करताना दिसणार आहे. प्रभूदेवा दिग्दर्शित हा सिनेमा 2020 मध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय ती आदित्य रॉय कपूरसोबत मलंग सिनेमातही दिसणार आहे. इतकेच नाही तर दिशा केटीना या सिनेमातही झळकणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/