Disha Patani | अभिनेत्री दिशा पाटनीने घेतली दिग्दर्शनाची धुरा हाती: पहिले गाणे झाले रिलीज

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) ही तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्डनेसमुळे (Disha Patani Boldness) जास्त ओळखली जाते. दिशाचा मोठा चाहता वर्ग असून सोशल मीडियावर देखील तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. दिशा पाटनी हिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून आपल्या अभिनयाच्या बळावर या इंडस्ट्रीमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. दिशाच्या अदांवर व बोल्डनेसवर संपूर्ण चाहता वर्ग फिदा आहे. अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून भूमिका साकारणाऱ्या दिशा पाटनीने (Disha Patani) आता दिग्दर्शनाची धुरा हाती घेतली आहे. तिने पहिले दिग्दर्शित केलेला गाण्य़ाचा अल्बम (Disha Patani Song Album) रिलीज झाला आहे.

बॉलीवुडची अदाकारा अर्थात दिशा पाटनी आपल्या हॉट फोटोशूटने (Disha Patani Hot Photoshoot) सोशल मीडियावर आग लावत असते. पण तिचे नुकतेच एक ‘क्यों करूं फिक्र’ हे गाणे (Kyon karun fikr Song) रिलीज झाले आहे. या गाण्यामध्ये समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करणारी व दिलखेचक डान्स करणारी दिशा प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. पण ‘क्यों करूं फिक्र’ या गाण्यामध्ये दिशा पाटनी हिने डान्स बरोबरच दिग्दर्शन (Disha Patani As Director) देखील केले आहे. या गाण्याच्या निमित्ताने दिशा ही दिग्दर्शन क्षेत्रीत देखील उतरली असून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री दिशा पाटनी हिच्या चाहत्यांना तिने सिनेक्षेत्रामध्ये उचलेले हे पाऊल अत्यंत आवडले असून सर्व लोक तिचे कौतुक करत आहे.

अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani)हिने दिग्दर्शित केलेल्या या ‘क्यों करूं फिक्र’ हे गाणे निकिता गांधी (Nikita Gandhi) हिने गायले आहे तर गाण्याचे बोल वायुने (Vayu) लिहिले आहेत. दिशाच्या या गाण्याला वैभव पानी (Vaibhav Pani) यांनी संगीत दिले आहे. दिग्दर्शनाबरोबर दिशाचे अनेक चित्रपट हे लवकरच मोठ्या पडद्यावर ध़कणार आहे. तिचा ‘योद्धा’ हा चित्रपट (Yoddha Movie) येणार असून यामध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत (Siddharth Malhotra) दिसणार आहे. यासोबतच दिशा ‘कांगुवा’ (Kangava Movie) या दाक्षिणात्य अॅक्शन ड्रामा सिनेमातही दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री साऊथचा प्रसिद्ध अभिनेता सुर्या शिवकुमारसोबत (Suriya Sivakumar) स्क्रीन शेअर करणार आहे. ‘कांगुवा’ चित्रपट पुढील वर्षी पॅन इंडिया 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 30-40 जणांवर FIR, येरवडा परिसरातील प्रकार

Dhananjay Munde | आता खतांसाठीही 100 टक्के अनुदान मिळणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे