अभिनेत्राी दिशा पटानीच्या वडिलांना ‘कोरोना’ची बाधा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांनादेखील कोरोनाची बाधा झाली आहे.
जगदीश पटानी असे त्यांचे नाव असून 5 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेश वीज वितरण कार्यालयातील अतिरिक्त सीएमओ अशोक कुमार यांनी ही माहिती दिली. त्यांच्यासोबत अन्य दोन कर्मचार्‍यांचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

जगदीश पटानी हे राज्य वीजवितरण विभागात डेप्युटी एसपी आहेत. काही दिवसांपूर्वी ते ट्रान्सफॉर्मर घोटाळ्याच्या चौकशीसाठी लखनौवरुन आले होते. तेव्हा त्यांची चाचणी केल्यावर त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यानंतर त्यांना 48 तास क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत अन्य दोन अधिकारीही पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत बॉलिवूडमधील काही कलाकार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. बीग बी अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर नुकतीच मात केली असून ते घरी परतले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like