बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या जीवाला धोका ? पाकिस्तानातून धमक्यांचे फोन ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून प्रेक्षकांची मने जिंकणारी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी हिला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. मात्र या धमक्या का मिळत आहेत, कोण देत आहे, याबद्दल अधिकृत माहिती नाही. पाकिस्तानातून तिला धमक्या मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.

तेलगू एंटरटेनमेंट पोर्टल ‘टॉलिवूड नेटने याबाबतचे वृत्त दिले आहे. दिशाला फोन कॉल्सद्वारे धमक्या दिल्या जात असल्याचा दावा या वृत्तात केला आहे. पाकिस्तानातील एका नंबरवरून तिला या धमक्या मिळत आहेत. दिशाच्या जवळच्या सूत्रांनी ही माहिती दिल्याचे वृत्तात म्हटले आहे. वृत्तानुसार, केवळ दिशालाच नाही तर पोलिसांनाही असे कॉल्स येत आहेत. अकाऊंट करो जल्दी, जल्दी, तेरा लडकी (दिशा पाटनी) नहीं बचेगा, अशी धमकी कॉलवरून मिळत आहे. धमक्या मिळत असलेले नंबर पाकिस्तानचे आहेत. मात्र दिशाने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला नाही.

दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल सागायचे तर ती शेवटची मलंग चित्रपटात दिसली होती. आता ती राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’मध्ये दिसणार आहे. यात ती सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी भेटीला येणार आहे.यासोबतच, दिशा लवकरच ‘एक विलेन 2 मध्ये दिसणार आहे, ज्याचे दिग्दर्शन मलंगचा दिग्दर्शक मोहित सूरी करणार आहे.