अभिनेत्री दिशा पटानी ‘त्या’ लिपस्टिकमुळं सोशलवर ‘गोत्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूड हॉट आणि क्युट अ‍ॅक्टरेस दिशा पटानी नेहमीच चर्चेत असते. दिशाच्या हॉटनेसमुळे तिचे चाहते तिचे दिवाणे आहेत. ती जितकी क्युट दिसते तितकीच तिची बोल्ड अदा आहे. खूप कमी दिवसात बॉलीवूडमध्ये आपले स्थान मिळवणारी दिशा आपले हॉट फोटोज सोशल मीडियावर शेयर करत असते. असाच एक फोटो तिनं नुकताच शेअर केला. पण हा फोटो पाहून अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. शेयर केलेल्या फोटोमध्ये दिशाने चंदेरी रंगाचा ड्रेस घेतला आहे आणि लाल कलरची लिपस्टिक लावली आहे.

https://www.instagram.com/p/B0xIXPHgqye/?utm_source=ig_embed

यात तिचा ग्लॅमरस लुक पाहायला मिळतोय. परंतु अनेकांना तिचा हा लुक आवडला नाही. कंमेंट्स करत त्यांनी दिशाला ट्रोल केलं. एका युजरनं लिहिलं आहे की, ‘तू या फोटोत पुरुषासारखी दिसतेय’. तर, दुसरा युजर लिहितो की, ‘मेकअपचं दुकान दिसतेयस’, असं म्हणत ट्रोल केलं. काही चाहत्यांना तिचा हा फोटो आवडला असून ‘कातिल लिप्स’ अशा कमेंट्स केल्या आहेत. ही काही पहिली वेळ नाही की, दिशाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. यापूर्वी देखील कपड्यांवरून दिशाला ट्रोल करण्यात आलं आहे.

आरोग्यविषयक वृत्त