अभिनेत्री दिशा पाटनीच्या बिकीनी फोटोंमुळे सोशलवर पुन्हा ‘राडा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची क्युट अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनी सध्या आपल्या आगामी सिनेमामध्ये व्यस्त आहे. असं असलं तरी गेल्या अनेक दिवसांपासून ती सोशलवर चर्चेत आहे. दिशा अनेकदा आपल्या बोल्ड अँड बिंधास्त फोटोंमुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं आपल्या पिंक बिकीनीतल्या फोटोंनी सोशलवर राडा घातला होता. यानंतर पुन्हा एकदा असंच काहीसं झालं आहे. पुन्हा एकदा दिशा तिच्या काही बिकीनी फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

दिशा इंस्टाग्रामवर सुपर अ‍ॅक्टीव असते. चाहत्यांसाठी नेहमीच ती काही ना काही शेअर करत असते. सध्या दिशाचे काही बिकीनीतले फोटो समोर आले आहेत जे प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. दिशा नेहमीच आपल्या बिकीनी फोटोंनी चाहत्यांना भुरळ घालत असते. दिशाच्या या बिकीनी फोटोंना 16 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. बिकीनी लुकमध्ये दिशा कमालीची हॉट दिसते. तिची अदा चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.

दिशाच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचं झालं तर, लवकरच दिशा मलंग सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मलंग सिनेमा बद्दल बोलायचं झालं तर दिशाव्यतिरीक्त या सिनेमात आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. मोहित सुरी सिनेमाचं डायरेक्शन करत आहेत. त्यांनी आशिकी 2 या सिनेमाचं यापूर्वी दिग्दर्शन केलं आहे. भूषण, लव रंजन, अंकुर व जय शेवकरमनी यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा –