कोटयावधी युवकांची ‘धडकन’ बनलेल्या दिशा पटाणीची ‘या’ अभिनेत्याला ‘इम्प्रेस’ करण्यासाठी ‘धडपड’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अल्पावधीत कोटयावधी युवकांची ‘धडकन’ बनलेल्या अभिनेत्री दिशा पटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यामधील ‘गॅटमॅट’ची जोरदार चर्चा सुरू आहे. दोघेही बहुसंख्य वेळा डिनर डेटवर जाताना तसेच ‘खुल्‍लमखुल्‍ला’ एकत्र फिरताना दिसतात. मात्र, दोघांनही त्यांच्या नात्याबद्दल अद्याप कबूली दिलेली नाही. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखती दरम्यान दिशाने आपण टायगर श्रॉफला ‘इम्प्रेस’ करण्याचा प्रयत्न करत असल्याची कबुली दिली आहे.

दिशाने टायगर श्रॉफला इम्प्रेस करत असल्याची कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे. मुलाखतीमध्ये दिशाला टायगरच्या नात्याबद्दल प्रश्‍न विचारण्यात आले होते. तिला ट्विटरवरील चाहत्याचा देखील एक प्रश्‍न विचारण्यात आला. ‘तुम्ही तुमच्या नात्याचा स्विकार का करत नाही, लोकांना तुम्ही एक कपल म्हणून फार आवडता’ असा प्रश्‍न चाहत्याने विचारला. त्यावर दिशाने त्याला उत्‍तर दिले. ती म्हणाली, गेल्या अनेक दिवसांपासून मी टायगरला ‘इम्प्रेस’ करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तिला अद्याप यश प्राप्‍त झालेले नाही. भारत चित्रपटाच्या रिलीजनंतर त्यामध्ये सुधारणा होईल.

भारत चित्रपटामध्ये मी अनेक स्टंट केले आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर टायगर माझ्यावर ‘इम्प्रेस’ होईल असे मला वाटते. आम्ही एकत्र डिनर जातो याचा अर्थ असा नाही की तो इम्प्रेस झालाय. आम्ही दोघेही लाजर्‍या स्वभावाचे असल्यामुळे आमच्यातील गोष्टी पुढे जात नाहीत असेही दिशा म्हणाली. सध्या दिशा ‘भारत’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये मग्‍न आहे. चित्रपटामध्ये तगडी ‘स्टारकास्ट’ आहे. सलमान खान, कतिरिना कैफ, सुनिल ग्रोवर, तब्बू आणि जॅकी श्रॉफ हे मोठे कलाकार मुख्य भुमिकेत दिसणार असुन दि. 5 जून रोजी चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये दिशा पटाणीसह अभिनेता आदित्य रॉय कपूर देखील दिसणार आहे. भारत या चित्रपटाकडून सलमान खानला मोठया अपेक्षा आहेत.

Loading...
You might also like