बॉडी फिट ड्रेसमध्ये दिशा पाटनीचा स्टायलिश अंदाज!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिशा पाटनी बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखेसोबत ती स्वत: ला चांगले मेंटेन ठेवते. तिचा स्टायलिश लुक सर्वांना मंत्रमुग्ध करतो. दिशा बर्‍याचदा बॉडी फिट ड्रेसमध्ये दिसत असते. दिशाचा हा रेड बॉडी फिट ड्रेस बऱ्यापैकी आकर्षक आणि सुंदर दिसत आहे. हा तिचा हाय थाई ड्रेस आहे. आपल्या ड्रेसशी मॅच करत तिने ब्लॅक स्ट्रॅपी स्टिलेटोस घातले आहे. तिने यात मेकअप देखील फार कमी केला आहे.

दिशाने नुकताच गुलाबी बॉडी फिट ड्रेसमध्ये एक फोटो शेअर केला आहे. जो चाहत्यांनी चांगलाच पसंत केला. तिने आपल्या आऊटफिटला मॅच करत गोल्डन चेनही घातली आहे. केस मोकळे सोडत स्लिंग बॅग देखील कॅरी केली आहे. तिचा हा फोटो हिवाळ्यातील आहे, म्हणूनच तिने व्हाईट कार्डिगन देखील कॅरी केली आहे. या फोटोवर चाहत्यांबरोबरच तिचा प्रियकर टायगर श्रॉफनेही हार्ट इमोजी शेअर केला आहे.

आणखी एका चित्रात दिशाने पातळ स्ट्राप सोबत नेटचा बॉडीफिट ड्रेस घातला आहे. या फोटोत तिने आपल्या बॉडीला चांगल्याप्रकारे फ्लॉन्ट केले आहे. दिशाने तिच्या ड्रेसवर मॅच करत हातात मोठ्या रिंगसोबत काही ज्वेलरी देखील कॅरी केली आहे. फोटोमध्ये दिशाने आपले केस मोकळे सोडले असून लाईट मेकअप केला आहे.

बॉडी फिट ड्रेस दिशांवर खूपच सुंदर दिसतात. ‘मलंग’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग वेळीही तिने शिमरी ग्रीन बॉडी फिट ड्रेस घातला होता. यात ती खूपच अट्रॅक्टीव्ह दिसत होती. आपल्या आऊटफिटशी मॅच करत हिल्स घालून तिने काही ज्वेलरी देखील कॅरी केली होती.

एका फोटोत दिशा सिंगर बियॉन्सेकडून बरीच प्रेरित असल्याचे दिसत आहे. फोटोमध्ये पाहु शकतो की, तिने जांभळ्या रंगाचा बॉडी फिट ड्रेस घातला आहे आणि आपल्या लुकला फ्लॉन्ट करताना दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने काळ्या रंगाचे बूट आणि ईयररिंग्स सोबत वेवी हेयर लुक केला आहे.

काळ्या रंगात सेलिब्रिटी असो किंवा सामान्य लोक सर्वच अत्यंत आकर्षक दिसतात. या फोटोत दिशाने काळ्या रंगाचा बॉडी फिट ड्रेस घातला आहे. तिने मेकअपही खूप लाईट केला आहे. ज्यामध्ये त्याचा चेहरा खूप चमकत आहे. तिचा लुक आणखी अट्रॅक्टीव्ह होण्यासाठी तिने काही ज्वेलरीही घातली आहे. या फोटोवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलीच पसंती दर्शविली.

काही दिवसांपूर्वी दिशा अगदी सिंपल बॉडीफिट ड्रेसला फ्लॉन्ट करताना दिसली होती. या ड्रेसमध्ये तिने तिचा एक सेल्फी क्लिक केला होता. यात तिने ऑय मेकअप सोबत न्यूड लिपस्टिक लावली आहे. हेयरस्टाइलमध्ये लूज कर्लसोबत ती खूपच सुंदर दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी दिशाने बर्‍याच रिंग्ज आणि ब्रेसलेट देखील घातले आहे.