Video : ‘वंडर वुमन’, ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीचा अंगावर शहारे आणणारा एका हातावरचा ‘कार्टव्हील’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये कमी काळात आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री दिशा पाटनी हीने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. दिशा स्वतःला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेते. दिशाने तिचा वर्कआउटचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. दिशाचे प्रत्येक व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. तिच्या चाहत्यांना तिने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओ खूप पसंतीस पडतात.

बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसारखे दिशा रोज जिमला जाते. ती हेल्दी लाइफस्टाइलचे वेगवेगळे स्टंट करत असते. नुकताच दिशाने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिशा एका हाताने कार्टव्हिल करताना दिसत आहे. दिशाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/Byz5ffmAMYw/

तिने व्हिडिओ शेअर करुन लिहले की, ‘Training after ages with my trainer Nadeem Akhtar Parkour.’ सोशल मिडियावर तिच्या या व्हिडिओला खूप पसंत केले जात आहे. व्हिडिओला पाहून लोक तिला ‘वंडर वुमेन’ बोलत आहेत. वर्कआउट सेशनसाठी दिशाने ब्लॅक शॉट्स आणि पिंक टॉप घातला आहे. दिशा नेहमी आपले बोल्ड फोटोसाठी चर्चेत असते.

https://www.instagram.com/p/ByhXMp6AfPy/

दिशाच्या कामाबद्दल बोलायचे म्हणले तर, ती नुकताच सुपरहिट ठरलेला ‘भारत’ चित्रपटात दिसून आली. या चित्रपटात दिशासोबत अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ, तब्बू, सुनील ग्रोवर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट ५ जूनला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला जलवा दाखविला. चित्रपटाने २०० करोडची कमाई केली. अली अब्बास जफर यांनी डायरेक्ट केलेला ‘भारत’ हा कोरियन चित्रपट ‘ओड टू माई फादर’ चा हिंदी रिमेक आहे.

 

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य 

कांशीराम यांनी सुरु केलेल्या सामाजिक न्याय आंदोलनाला मायावतींनी कमजोर केले – चंद्रशेखर आझाद

दुष्काळी परिस्थतीत महावितरणकडुन विज पुरवठा खंडित करण्याची मोहिम

भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा भगवा रंग योग्यच : रामदास आठवले

‘जय श्रीराम’ न बोलणाऱ्या तरुणास मारहाण