दिशा पटानीचं आर्म वॉर्मर स्वेटर चर्चेत, 1200 रुपयांना आपणही करू शकता खरेदी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अभिनेत्री दिशा पटानी आपल्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत राहते. तिचे बिकिनी फोटोही बर्‍याचदा व्हायरल होतात. सोमवारी अभिनेत्रीला स्पॉट करण्यात आले होते. या दरम्यानचा तिचा पोशाख चर्चेत राहिला आहे. दिशा पटानीने आर्म वॉर्मर स्वेटर परिधान केल्याचे दिसत आहे. आर्म वॉर्मर सोबत दिशाने व्हाईट कलरचा ऑफ शोल्डर टॉप आणि ब्लॅक ट्राऊजर परिधान केली आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

दिशाचा हा संपूर्ण लुक खूप इम्प्रेसिव्ह दिसत आहे, पण दिशाने जे आर्म वॉर्मर स्वेटर कॅरी केले आहे, त्या स्वेटरची सोशल मीडियावर यापूर्वी थट्टा उडवण्यात आली आहे. या आर्म वॉर्मरचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते, अनेक प्रकारचे मीम्सदेखील बनविण्यात आले होते. काही वापरकर्त्यांनी त्याची रचना करणार्‍या कंपनीची चेष्टा देखील केली होती. यास विअर्ड फॅशनमध्ये काउंट करण्यात आले होते.

आता, जर आपण या वार्मरच्या किंमतीबद्दल बघितले तर अहवालानुसार त्याची किंमत अंदाजे 1,200 रुपये सांगितली जात आहे. या वॉर्मरमुळे दिशा पटानी देखील चर्चेत आली आहे. पर्सनल लाइफविषयी चर्चा केली तर दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ एकमेकांना डेट करत असल्याची बातमी चर्चेत आहे. तथापि, या दोघांनी कधीही जाहीरपणे त्यांच्या नात्याबाबत काही सांगितलेले नाही.

दिशाच्या वर्क फ्रंटबद्दल चर्चा केली तर ती लवकरच राधे चित्रपटात सलमान खानच्या सोबत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा यांनी केले आहे. यामध्ये जॅकी श्रॉफ आणि रणदीप हूडा देखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.