‘BOLD’ अवतारातील दिशा पाटनी म्हणते, ‘हुई मै मलंग’, दिशाचं नवीन गाणं ‘रिलीज’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार दिशा पाटनी, आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू स्टारर मलंग सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचा ट्रेलर खूप चर्चेत राहिला आहे. यानंतर सिनेमातील गाणी रिलीज होताना दिसत आहेत. सिनेमाच्या आधीच दिशा तिच्या हॉट अंदाजामुळं सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. नुकतंच दिशा पाटनीचं नवीन गाणं रिलीज झालं आहे. हुई मलंग असं या गाण्याचं नाव आहे. सध्या गाण्याची सोशलवर चर्चा सुरु असल्याचं दिसत आहे.

हुई मलंग या गाण्यात दिशाचा वेगळाच अंदाज पहायला मिळत आहे. दिशाच्या हॉट अवतारामुळं हे गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. सिनेमातील रिलीज झालेल्या इतर गाण्यांपैकी या गाण्यात दिशा काही वेगळीच दिसत आहे असं चाहत्यांकडून बोललं जात आहे. सध्या दिशा या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मलंगव्यतिरीक्त दिशा टायगर श्रॉफ आणि श्रद्ध कपूर यांच्या बागी 3 या सिनेमातही दिसणार आहे. मलंग सिनेमा बद्दल बोलायचं झालं तर दिशाव्यतिरीक्त या सिनेमात आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.

https://www.instagram.com/p/B8DmC8TgeiC/