अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या फिटनेस आणि हॉट फोटोंमुळे चर्चेत असणारी बॉलिवूड स्टार दिशा पाटनी अनेक ब्रँड्सच्या जाहिरातीत काम करताना दिसते. दिशा पोर्टिको न्यूयॉर्क कलेक्शन Just Us and Mix Don’t Matchचा चेहरा आहे. दिशानं नुकताच आपल्या बेडरूम सिक्रेटचा खुलासा केल्यानं सोशलवर ती चर्चेत आली आहे.

https://www.instagram.com/p/Byz5ffmAMYw/?utm_source=ig_embed

एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, दिशा म्हणाली, “पोर्टिको न्यूयॉर्क कुटुंबाचा हिस्सा झाल्यानंतर मी खूप खुश आहे. रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी आणि माझी प्रत्येक रात्र पहिल्या रात्रीप्रमाणे ‘जस्ट अस’ सोबत ती साजरी करणं हेच माझं बेडरूम सिक्रेट आहे.”

https://www.instagram.com/p/B3el0S5gYFc/

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती आपला आगामी सिनेमा राधे च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात तिच्यासोबत सलमान खान दिसत आहे. प्रभूदेवा दिग्दर्शित हा सिनेमा 2020 मध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय ती आदित्य रॉय कपूरसोबत मलंग सिनेमातही दिसणार आहे. मोहित सूरी हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ सोबत रिलेशनशिपमध्ये आहे.