दिशा पाटनीनं मालदीवला पोहचताच दाखवला जलवा, शेअर केला बिकिनी फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   महाराष्ट्रात लागलेल्या कोरोना कर्फ्यू मध्ये अनेक सेलिब्रिटीज सुट्टीचा आनंद घेण्यासाठी शहराबाहेर गेले आहेत. सध्याच टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांना एकत्र एयरपोर्टवर स्पॉट केले गेले होते, येथून ते मालदिवसाठी गेले होते. आता मालदीवमध्ये पोहचताच अभिनेत्री दिशा पाटनी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक फोटो शेर केला आहे, ज्यामध्ये त्या बिकिनीमध्ये दिसल्या आहेत. त्यांचा हा फोटो चाहत्यांना आवडला आहे. त्यांच्या या फोटोवर लोक प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

 

अभिनेत्रीने हा फोटो त्यांच्या सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आणि ट्विटर हँडलवर शेर केला आहे. अभिनेत्रीने तपकिरी रंगाची बिकिनी घातल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. समुद्र किनारी बसलेली दिशा पाटनी खूपच सुंदर दिसत आहे. त्यांचा हा आकर्षक लूक सर्वांना आवडला आहे. दिशाचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

चाहत्यांनी दिली प्रतिक्रिया

या फोटोला बराच प्रतिसाद मिळाला आहे. एका युजरने ”Beautiful” अशी कमेंट केली, तर दुसऱ्या युजर्सने लिहिले, ”आपका जवाब नहीं”. याव्यतिरिक्त, त्याच्या चाहत्यांनी हार्ट इमोजी शेर करून प्रेम व्यक्त केले आहे. दिशा यांनी सध्याच एक फोटो शेर केला होता ज्यामध्ये त्या मालदीवला मिस करताना दिसत होत्या.

अभिनेत्रींच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्या गेल्यावेळी ‘मलंग’ मध्ये दिसल्या होत्या. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू दिसले आहेत. याशिवाय त्यांनी चित्रपट बागी ३ मध्ये स्पेशल अपिरियंट दिली होती. दिशाच्या आगामी प्रोजेक्ट विषयी बोलायचे झाले तर आता सलमान खानसोबत ‘राधे: योर मोस्ट वॉंटेड’ मध्ये दिसतील. त्यांचा हा चित्रपट ईदला रिलीज होणार आहे. याशिवाय दिशा ‘एक विलन २’ मध्ये अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहम यांच्यासोबत दिसतील. त्यांच्या या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.