दिशा पाटनीने पिंक बिकिनीतील फोटो केला शेअर; चाहत्यांनी दिली प्रतिक्रिया

पोलिसनामा ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी हि तिच्या काम आणि स्टाईलबाबत नेहमी चर्चेत राहिली आहे. दिशा बर्‍याचवेळा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. तिची अदाकारी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. दिशा पाटानीने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून तो जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोत ती एका पुलशेजारी बिकनीत उभी राहिली आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केला बिकिनीतील फोटो
दिशाने गुलाबी रंगाची बिकिनी घालून तो फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. फोटोत दिशा पूलाशेजारी उभी राहिलेली आहे. या फोटोला भरपूर प्रतिसाद तिच्या चाहत्यांना दिला आहे.

 

 

 

 

चाहत्यांनी दिली प्रतिक्रिया
बिकनीतील फोटो पाहून दिशाच्या चाहत्यांनी तिला प्रतिक्रिया दिल्या आहेत. ती फोटोत खूप सुंदर दिसत आहे. तसेच पोझ देखील चांगली दिली आहे. पिंक रंगाच्या बिकनीतील फोटो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

दिशा पाटनी वर्क फ्रंट
दिशा पाटनीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलताना अभिनेत्री अखेर ’मलंग’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात त्यांच्यासोबत आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. आता दिशा लवकरच सलमान खानसमवेत ’राधेः योर मोस्ट वॉन्टेड’ चित्रपटात दिसणार आहे. सलमान आणि दिशा ईदवर हा चित्रपट रिलीज होणार होता पण, कोरोना साथीमुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.