Photos : ‘बोल्ड’ फोटोंमुळं पुन्हा ट्रोल झाली दिशा पाटनी ! ट्रोलर्स म्हणाले – ‘प्रयत्न कर, नक्कीच अभिनेत्री बनशील’

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनी (Disha Patani) आपल्या बोल्ड अवतारामुळं सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत येताना दिसत असते. कधी दिशा तिच्या वर्कआउटच्या फोटोंमुळं किंवा व्हिडीओंमुळंही चर्चेत येताना दिसत असते तर कधी हॉट लुक किंवा बोल्ड फोटोशुट. आज तिच्या काही फोटोंमुळं दिशा प्रचंड ट्रोल झाली आहे. हॉट अदा दाखवण्यासोबत थोडी अ‍ॅक्टींगही शिक असं काहींनी तिला म्हटलं आहे.

दिशानं तिच्या ट्विटरवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत दिशानं बिकिनी घातली आहे. यात ती खूपच हॉट अँड बोल्ड दिसत आहे. तिनं दिलेली पोजही लक्ष वेधून घेत आहे. फोटोत ती हॉट क्लीव्हेज आणि लेग्स फ्लाँट करत आहेत. तिची फिगरही आकर्षक दिसत आहे. काहींना तिचे हे फोटो आवडले आहेत तर काहींनी तिला यासाठी ट्रोल केलं आहे.

काहींनी युजरनं कमेंट करत लिहिलं आहे की, थोडी अ‍ॅक्टींगही शिक. काही लोक म्हणाले तू अ‍ॅक्टींग शिकून घे, अ‍ॅक्ट्रेसही बनू शकतेस. एकानं त कपड्यांवरून कमेंट करत लिहिलं की, तुझ्याकडे इतके पैसे आहेत मग कपडे का नाही घालत.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती मलंग सिनेमात दिसली होती. याशिवाय काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या टायगर श्रॉफच्या बागी 3 सिनेमात दिशा आयटम नंबर करताना दिसली. लवकरच दिशा आगामी सिनेमा राधे : योर मोस्ट वॉन्टेड भाई या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती सलमान खानसोबत काम करणार आहे. याशिवाय ती एकता कपूरच्या केटीना आणि रणबीर कपूरच्या लव रंजन या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.