‘फिटनेस क्विन’ दिशा पाटनीने गुडघ्याला दुखापत झाल्यानंतरही केला ‘खतरनाक स्टंट’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची फिटनेस क्विन आणि क्युट अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनी काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती. दिशाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता त्यात ती बॅक फ्लिप मारताना दिसून आली होती. असाच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात दिशा फ्रंट फ्लिप मारताना दिसत आहे. मध्यंतरी गुडघ्याला दुखापत झाल्यानंतर तिने फ्रंट फ्लिप करण्याचा प्रयत्न सोडला होता. यातून बरी झाली नाही तेच तिने सक्सेसफुली फ्रंट फ्लिप मारली आहे. सध्या तिचा हा फ्रंट फ्लिपवाला व्हिडीओ सोशलवर वाऱ्यासारखा पसरत आहे.

आपल्या फिटनेसमुळे दिशा नेहमीच चर्चेचा हिस्सा बनलेली असते. टायगरसोबतच्या रिलेशनशिपमुळेही दिशा चर्चेत राहिली आहे. आपल्या वर्कआऊटचे अनेक फोटो आणि व्हिडीओ दिशाने अनेकदा सोशलवर शेअर केले आहेत. नुकतीच दिशा भारत सिनेमात झळकली. यात ती स्टंट करताना दिसून आली. दिशाने मिक्स मार्शल आर्टचं ट्रेनिंग घेतलं आहे. भारतच्या स्टंटदरम्यान तिला दुखापत झआली होती.

दिशा सध्या जिमनॅस्टिकसाठी ट्रेनिंग घेत आहे. यासाठी रोजचा सराव असणं खूप गरजेचं असतं असं दिशा म्हणते. शुटींगमधून वेळ मिळतो तेव्हा दिशा जिमनॅस्टिक आणि मिक्स मार्शल आर्टची प्रॅक्टीस करत असते. मिक्स मार्शल आर्ट सोपं आहे असंही दिशा म्हणाली आहे.

दिशाच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचे झाले तर, लवकरच दिशा मलंग सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तिच्या व्यतिरीक्त कुणाल खेमू आणि अनिल कपूर देखील दिसणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त