Disha Patani – Tiger Shroff | दिशा पटानीला जपायचे होते टायगर श्रॉफ सोबतचे नाते, म्हणत होती – ‘माझ्याशी लग्न कर’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Disha Patani – Tiger Shroff | टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि दिशा पटानी (Disha Patani) यांच्या नात्याच्या बातम्या नेहमीच चर्चेत असतात. दोघेही खूप वेळ एकत्र घालवताना, एकत्र व्हेकेशनवर जाताना दिसले. अगदी त्यांचा प्रत्येक खास दिवस एकमेकांसोबत साजरा करतात. मात्र, दोघांनीही त्यांचे नाते कधीच अधिकृतपणे स्वीकारलेले नाही. पण नुकतेच दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येत होत्या. ही बातमी ऐकून दोघांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या वर्षी मार्चमध्ये त्यांच्या लग्नाच्या बातम्याही चर्चेत होत्या. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता ब्रेकअप (Breakup) च्या बातमीने सर्वांची निराशा केली आहे. (Disha Patani – Tiger Shroff)

 

दिशाला करायचे होते लग्न
आता ई टाइम्सच्या रिपोर्टनुसार, टायगर त्याच्या आई-वडिलांपासून वेगळे राहत होता तेव्हापासून दिशा आणि टायगर एकत्र राहत होते. दोघेही बराच काळ एकत्र होते आणि यावर्षी दिशाला वाटले की आता लग्न (marriage) करावे. (Disha Patani – Tiger Shroff)

 

दिशाने पुन्हा तिच्या भावना टायगरसोबत शेअर केल्या, मात्र टायगर अद्याप त्यासाठी तयार नाही. दिशाने टायगरला अनेकदा सांगितले, पण टायगर तिला नेहमी म्हणत असे की आता नाही.

 

दिशा किंवा टायगरने यावर सध्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल द्वेष नक्कीच नाही. रिपोर्टनुसार, दिशाने ब्रेकअपपासून स्वतःला सांभाळले आहे आणि येत्या काळात दोघांमध्ये सर्व काही ठीक होईल आणि दोघेही लग्न करतील अशी शक्यता आहे. तसे, दोघेही प्रोफेशनली एकमेकांना सपोर्ट करतात.

प्रोफेशनल लाईफ
दिशा सध्या ’एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
या चित्रपटात ती जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारियासोबत (John Abraham, Arjun Kapoor, Tara Sutaria) दिसणार आहे.
हा चित्रपट 29 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.

 

दुसरीकडे, टायगर श्रॉफबद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच त्याने स्क्रू ढीला या चित्रपटाची घोषणा केली आहे.
याशिवाय तो गणपत आणि हिरोपंती 2 या चित्रपटात दिसणार आहे.

 

Web Title :- Disha Patani – Tiger Shroff | disha patani want to take one step forward in relationship she used to say tiger shadi karo mujhse reports

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | ऑगस्टमध्ये DA Hike सह 3 प्रकारची भेट देऊ शकते सरकार, केंद्रीय कर्मचार्‍यांनी रहावे तयार !

 

Diabetes मुळे शरीराच्या ‘या’ भागात होतात तीव्र वेदना, जाणून घ्या कसा दूर होईल त्रास

 

Pune Crime | दुर्दैवी ! पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात डंपरचे चाक अंगावरुन गेल्याने महिला प्राध्यापिकेचा मृत्यू