मनोरंजन

टायगर श्रॉफसोबत विमानतळावर स्पॉट झाली दिशा पाटनी, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकने पाडली छाप

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध जोडी दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ अलीकडेच विमानतळावर स्पॉट झाले होते. या दरम्यान दिशा पाटनी अत्यंत ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. त्याचवेळी टायगर श्रॉफही दिशाशी मॅच करणाऱ्या कपड्यांमध्ये दिसून आला. दिशा पाटनीने फुल स्लीव्हजचा व्हाईट क्रॉप टॉप आणि ब्लॅक बॉटम्स परिधान केले होते. तिने व्हाईट स्नीकर्ससह तिचा लूक कम्प्लीट केला होता. दिशा तिच्या एअरपोर्ट लूकमध्ये खूपच वेगळी दिसत होती. तिचा ग्लॅमरस लूक पाहण्यासारखा होता.

टायगर श्रॉफही व्हाइट टी-शर्ट आणि डिप ग्रे ट्रॅक पॅन्टमध्ये दिसला. त्याने पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स देखील घातले. तो डेनिम जॅकेट हातात घेऊन कारच्या बाहेर फिरताना दिसला. दोन्ही सेलेब्रिटींनी एकमेकांना कॉम्प्लीमेंट करत मॅचिंग कपडे घातले होते. टायगरनेही मास्क काढून पोझ दिल्या.

टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी यांच्या नात्याबाबत बरीच चर्चा झाली आहे. जरी या दोघांनी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी त्यांच्या पोस्टवरून त्यांच्या नात्याचे सत्य समोर आले आहे. वाढदिवस असो वा अन्य कोणताही कार्यक्रम, दोन्ही सेलेब्स एकमेकांसोबत पार्टीमध्ये हजेरी लावताना दिसतात. हे दोघेही बर्‍याच कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत.

Back to top button