दिशा पाटनी ‘मलंग’च्या टीमसोबत साजरा करतेय ‘वॅलेंटाईन डे’, चाहते म्हणाले – ‘टायगर कुठं आहे ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ यांच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. दोघे अनेकदा एकत्र स्पॉट होत असतात. टायगरचे वडिल आणि बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफ यांनीही अप्रत्यक्षपणे त्यांचं नातं मान्य केलं आहे. आज सगळीकडे वॅलेंटाईन डे साजरा होताना दिसत आहे. या खास दिवशी दिशा आपला बॉयफ्रेंड टायगरसोबत नाही तर कुठे दुसरीकडे वेळ घालवताना दिसत आहे. जाणून घेऊयात काय आहे तिचा वॅलेंटाईन प्लॅन आणि त्यावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत.

दिशानं इंस्टाग्राम वरून एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती टायगरसोबत नाही तर मलंगच्या टीमसोबत टाईम स्पेंड करताना दिसत आहे. या फोटोत दिशाचा मलंगमधील कोस्टार आदित्य रॉय कपूर, कुणाल खेमू, अनिक कपूर, अमृता खानविलकर असे सर्वजण दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये दिशा म्हणते, “माझ्या सर्वात आवडत्या लोकांसोबत.” हा फोटो एवढा व्हायरल झाला की काही तासांतच फोटोला 5 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी तिला टायगरबद्दल प्रश्न विचारला आहे.

चाहते म्हणाले, टायगर कुठंय ?
दिशाच्या फोटोवर कमेंट करत लोकांनी तिला टायगरबद्दल विचारलं आहे. एकानं कमेंट करत म्हटलं आहे की, टायगर कुठं आहे ? आणखी एकानं दिशाला आठवण करू दिली आहे की, आज ब्लॅक डे आहे आणि हे तिनं लक्षात ठेवायला हवं. काहींनी तिला वॅलेंटाईनच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like