वाढदिवशीच दिशा पाटनीच्या घरी आला ‘नवा पाहुणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अॅक्ट्रेस दिशा पाटनीचा नुकताच वाढदिवस पार पडला. या खास दिवशी अनेकांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिचा कथित बॉयफ्रेंड आणि अॅक्टर टायगर श्रॉफने तर एक डान्स व्हिडीओ शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अशातच दिशाच्या घरी एक नवीन पाहुणा आल्याचे समोर आले आहे.

दिशा पाटनीने तिच्या इंस्टाग्रामवरून याबाबत फोटो शेअर करत माहिती दिली आहे की तिच्या घरी या नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. तिच्या घरी जो नवीन पाहुणा आला आहे तो तिचा नवीन पेट आहे. हा पेट म्हणजे मांजरीचं पिल्लू आहे. दिशा या मांजरीच्या पिल्लाचा फोटो शेअर करत म्हटले आहे की, “परिवारात तुझं स्वागत आहे, किट्टी(Keety).”

Disha Patni

दिशाने किट्टीचा फोटो आणि व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीलाही शेअर केले आहेत. दिशाने किटीचा क्युट असा फोटो शेअर करत त्या सगळ्या लोकांना धन्यवाद दिले आहेत ज्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच एका व्हिडीओत ती किट्टीसोबत खेळताना दिसत आहे.

सेलिब्रिटी लोक आपला वाढदिवस पार्ट्या करत साजरा करतात. परंतु दिशाने सांगितले होते की, ती तिच्या वाढदिवसाच्या दिवशीही बिजी असेल. ती या दिवशी तिचा आगामी सिनेमा मलंगची शुटींग करणार आहे. एका मुलाखतीत दिशा म्हणाली होती की, “मला माहीत आहे हे थोडं विचित्र वाटेल परंतु मला आठवत नाही की मी माझा शेवटचा वाढदिवस कधी साजरा केला होता. मी मलंगच्या शुटींगमध्ये बिजी आहे. त्यामुळे फार फार तर मी मित्रांसोबत डिनरसाठी बाहेर जाईन.”

View this post on Instagram

🌹🌹🌹 #mycalvins @calvinklein

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर भारत सिनेमानंतर ती आता मलंग या सिनेमाच्या शुटींगमध्ये बिजी आहे. या सिनेमात आदित्य रॉय कूपर, अनिल कपूर, कुणाल खेमू हे कलाकार दिसणार आहेत. मोहित सुरी या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत.

सिनेजगत

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ