‘इन्स्टा’वर 4 फोटो पोस्ट करत दिशा पाटनीनं शेअर केला ‘हा’ मेसेज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिशा पाटनी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फिटनेस व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर एकामागोमाग एक चार फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना दिशानं काही ‘मोटिव्हेशनल कोट्स’ शेअर केले आहेत. दिशानं या फोटोला कॅप्शन देताना लिहिलं, ‘तुम्ही जे काल होता, त्यापेक्षा अधिक चांगलं होण्याचा प्रयत्न करा.’ सध्या सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

☀️

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

इन्स्टाग्राम अकाउंटवर लागोपाठ चार फोटो शेअर केले आहेत. दिशा या फोटोमध्ये व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. हे फोटो शेअर करताना दिशानं काही मोटिव्हेशनल टिप्स सुद्धा शेअर केल्या आहेत.

आपल्या फिटनेसमुळे दिशा नेहमीच चर्चेचा हिस्सा बनलेली असते. टायगरसोबतच्या रिलेशनशिपमुळेही दिशा चर्चेत राहिली आहे. आपल्या वर्कआऊटचे अनेक फोटो आणि व्हिडीओ दिशाने अनेकदा सोशलवर शेअर केले आहेत. नुकतीच दिशा भारत सिनेमात झळकली.

View this post on Instagram

Last one i promise💀🙈☀️

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशा सध्या जिमनॅस्टिकसाठी ट्रेनिंग घेत आहे. दिशाच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचे झाले तर, लवकरच दिशा मलंग सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तिच्या व्यतिरीक्त कुणाल खेमू आणि अनिल कपूर देखील दिसणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like