आदित्य ठाकरेंच्या बर्थडेनिमित्त दिशा पटानीनं केलं ट्विट, म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांची मैत्रीण व अभिनेत्री दिशा पटानीने सोशल मीडियाद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा आदित्य ठाकरे. असे ट्वीट तिने केले आहे.‘ आदित्य ठाकरे यांचे नाव दिशासोबत जोडले गेले आहे. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र असून अनेकदा त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दिशाने यापुर्वी आदित्य ठाकरेंच्या मंत्रीपदावर प्रतिक्रिया दिली होती. आदित्य माझा चांगला मित्र आहे आणि त्याच्या कामावर मला खूप विश्वास आहे. सध्या देशाला एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आणि आदित्यसारखा तरुण नेता महाराष्ट्राला मिळाला ही खूपच चांगली गोष्टी आहे. आदित्य यांच्या कामाची स्तुती करत ती पुढे म्हणाली, ते पर्यावरण संवर्धनासाठी बरंच काही करत आहेत. खास करून जंगल वाचवण्यासाठी त्यांनी चांगले पाऊल उचलले आहे.

आता महाराष्ट्र सुरक्षित हातात आहे. त्यांनी मुंबईच्या नाइट लाइफला चालना दिली आहे. आता तुम्ही रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरु शकता, सिनेमा पाहू शकता. नाइट लाइफच्या संकल्पनेवर त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसैनिकांनी असतील त्या ठिकाणाहूनच शुभेच्छा देण्याची विनंती त्यांनी केली आहे. दरवर्षी आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी होते.